कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य लीना काडलकर होत्या. प्रमुख मार्गदर्शक ऋतुजा वेरुळकर यांनी एच.आय.व्ही. एड्ससंदर्भात समाजमनात असणारी भीती, गैरसमजुती आणि जनजागृती या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या रासेयो क्षेत्रिय समन्वयक सुवर्णा गाडगे यांनी रासेयो व युवकांपुढील आव्हाने या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेला १५३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी पूनम देशमुख व संचालन सीमा अढाऊ यांनी केले. आभार अनूप आत्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी वंदना भोयर, वंदना हिवसे, सचिन टिकार यांनी परिश्रम घेतले.
इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:18 IST