शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या करणारा आंतरराज्यीय अट्टल आरोपी जेरबंद, एलसीबीची दमदार कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: August 17, 2023 19:45 IST

आरोपीकडून ९.११ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

अमरावती: जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय ठकास जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने यश मिळविले. दिपक भिमराव दांडगे (२५ वर्ष, रा. घुघरी ता. भैसदेही, जि. बैतुल मध्यप्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. १७ ऑगस्ट रोजी केलेल्या दमदार कारवाईत आरोपीकडून ११७ ग्रॅम सोने, ४२४ ग्रॅम चांदी, १० मोबाईल फोन, लॅपटॉप, मोटर सायकल व रोख असा तब्बल ९ लाख ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्हयातील चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरण वानखडे यांनी आपले पथक कार्यान्वित केले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक सचिन पवार व त्यांचे पथक १७ ऑगस्ट रोजी मेळघाटात होणा-या चो-यांबाबत तपास करीत असता मेळघाटातील गावात चोरी करुन दिपक दांडगे नावाचा इसम सध्या परतवाडा शहरात फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याआधारे सापळा रचून त्याला परतवाडा शहरातून ताब्यात घेण्यात आले.

१२ गुन्हयांची कबुली

त्याने चिखलदरा, आसेगाव, अचलपुर, दर्यापूर, परतवाडा, मोर्शी व चांदुरबाजार भागात घरफोडया केल्याची कबुली दिली. त्याच्या अटकेने जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात नोंद १२ गुन्हयांचा उलगडा झाला आहे. चोरलेले सोने, चांदीचे दागिने परतवाडा शहरात विकल्याची कबुली त्याने दिली. त्याचेकडून तब्बल ६.४३ लाख रुपये किमतीचे सोने, १ लाख रुपयांचे मोबाईल, लॅपटॉप, विनानंबरची मोटर सायकल व २८ हजार रोख जप्त करण्यात आली.यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, युवराज मानमोठे, स्वप्निल तंवर, रवींद्र वऱ्हाडे, सागर नाठे, शांताराम सोनोने, सागर धापड, शिवा सिरसाट, हर्षद घुसे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी