शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या

By admin | Updated: November 3, 2016 00:24 IST

आंतरजिल्हा बदलीसाठी प्राप्त ४२९शिक्षकांनी शासनाने विहित केलेल्या पध्दतीनुसार जिल्हा परिषदेकडे अर्ज सादर केले .

धरणे आंदोलन : बदलीच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा कराअमरावती : आंतरजिल्हा बदलीसाठी प्राप्त ४२९शिक्षकांनी शासनाने विहित केलेल्या पध्दतीनुसार जिल्हा परिषदेकडे अर्ज सादर केले . मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही.त्यामुळे आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकाच्या प्रस्तावाचा निपटारा करावा यासह अन्य मागण्यासाठी बुधवार पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.जिल्हा परिषदे अंतर्गत सन २००७ पासून शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीबाबत कुठलीच अंमलबजावणी शिक्षक विभागाने केली नाही. या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाला वारंवार निवेदन व आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयन्न केला . सद्यास्थितीत बदलीसाठी पात्र असलेल्या ४२९ शिक्षकांना शासनाने ठरवून दिलेल्या पध्दतीनुसार अर्ज करूनही त्याचा विचार जिल्हा परिषद प्रशासनाने केला नाही. उलट शासनाची दिशाभूल करून २०१०्- २०११ च्या रिक्त पदांचा चुकीचा अहवाल शिक्षण संचालकाकडे सादर केला. सरळ सेवाभरतीने शिक्षकांची नियमबाहय २४८ पदे भरल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघनेने केला आहे.२ नोव्हेबर पासून विभागीय आयुक्त कार्यालया समोर आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन कर्त्या शिक्षकांच्या प्रमुख मागण्यामध्ये नियमबाह्य शिक्षक भरतीची चौकशी करून संबंधितावर योग्य कारवाई करण्यात यावी, विद्यार्थ्याचा शैषणिक दुष्टया विचार करून सद्यास्थितीत शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, आंतरजिल्हा बदली करिता वाढीव पदांना मान्यता अथवा पोकळ बिंदू नामावलीचा अवलंब करावा, आंतरजिल्हा बदली सेवाज्येष्ठता यादीतून गहाळ झालेल्या प्रस्वाचासंबंधी दोषीवर कारवाई करावी, खासगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनव सीईटी २०१० मधील पात्र प्रतिक्षारत शिक्षण सेवकांना रूजू करण्यापूर्वी आंतरजिल्हा बदली शिक्षकांना रिक्त जागी पदस्थापना देण्यात यावी, आदी मागण्यासाठी शिक्षकांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक महेश ठाकरे,नागसेन रामटेके, निलेश बुटले, नंदकिशोर धर्म, अमोल वऱ्हेकर, अनिनाश मेश्राम, सुरज सोनटक्के, राहूल चर्जन, निलेश रसे, सारंग धामनकर आदींचा सहभाग आहे.