शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते देखभाल-दुरुस्तीसाठी आता 'इंटिग्रेटेड सिस्टिम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 19:45 IST

खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करूनही रस्त्याचा दर्जा सुधारत नसल्याने बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नवीन इंटिग्रेटेड सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये लहान-लहान कामे देण्यापेक्षा मोठी कामे घेण्यावर भर असणार आहे.

-जितेंद्र दखनेअमरावती  - खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करूनही रस्त्याचा दर्जा सुधारत नसल्याने बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नवीन इंटिग्रेटेड सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये लहान-लहान कामे देण्यापेक्षा मोठी कामे घेण्यावर भर असणार आहे. यामुळे एकूणच निविदांची संख्या कमी होणार आहे. याद्वारे रस्त्यांचा दर्जा राखण्यावर भर दिला जात आहे.खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी १५ डिसेंबरची 'डेडलाईन' दिली होती. परंतु, मुदतीत हे काम पूर्ण होऊ शकले नाही. प्रत्येक कामाचे स्वरूप त्यामुळे निविदांची वाढणारी संख्या व त्यातच अतिरिक्त रस्ते विकासाचा भार आणि सुमार दर्जा यामुळे राज्यातील बहुतांश रस्ते आजही खड्डेमुक्त झालेले नाहीत. यावर उपाय म्हणून बांधकाम खात्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नवीन इंटिग्रेटेड सिस्टिम कार्यान्वित केली आहे. यात नवीन रस्त्यांची कामे, रुंदीकरण, अथवा विस्ताराचे काम न घेता ते रस्ते टिकविण्यावर भर देण्यात येणार आहे. एक किंवा दोन कोटींची लहान कामे न घेता गट पद्धतीने मोठी कामे समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे निविदांची संख्या कमी करण्यावर भर दिला जात आहे. ही प्रणाली कार्यान्वित केल्यामुळे निविदांची संख्या कमी होणार आहे. यामध्ये राज्यातील प्रमुख मार्गांचा समावेश असेल. तसेच प्रमुख जिल्हा मार्गाचीही  दुरुस्ती याद्वारे होणार आहे. रस्त्यांच्या स्थितीनुसार कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. नवीन रस्त्यांची कामे या प्रणालीमध्ये नसतील. गट पद्धतीने काम करून घेण्यावर अधिक भर असणार आहे. रस्त्यांची दुरुस्तीची कामे इंटिग्रेटेड पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाने नियोजन सुरू केले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून राज्यभरातील रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे. सुरुवातीला एक पदरी नंतर दुपदरी रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकnewsबातम्या