शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

पशुधनाला विम्याचे संरक्षण कवच

By admin | Updated: April 19, 2016 00:17 IST

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे संरक्षण मिळत आहे. परंतु पशुधनाचा लाभ काही शेतकऱ्यांनाच या योजनामध्ये विमा संरक्षण मिळत होते.

राष्ट्रीय पशुधन विमा योजना : जिल्ह्यात तीन हजार जनावरांचा काढला विमा गजानन मोहोड अमरावतीकृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे संरक्षण मिळत आहे. परंतु पशुधनाचा लाभ काही शेतकऱ्यांनाच या योजनामध्ये विमा संरक्षण मिळत होते. इतर जनावरांना या विम्याचे कवच उपलब्ध नव्हते. आता सरसकट सर्वच पशुधन घटकांना विम्याने संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात दोन महिन्यांत तीन हजार पशुधनांचा विमा काढण्यात आला होता. राष्ट्रीय पशुधन विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही उपलब्धी झाली आहे. सलग नापिकी, दुष्काळ व नैसर्गिक आपत्ती यामध्ये दोन्ही हंगामातील पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पशुधनाला संरक्षणाचे विमा कवच देणे व बहुमूल्य पशुधन अपघाती दगावल्यास विमा कंपनीद्वारे शेतकऱ्यांना पुरेपूर मोबदला देणे अगत्याचे आहे. शासनाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय पशुधन विमा योजनेपूर्वी शासकीय योजनेमध्ये वाटप करण्यात आलेल्या जनावरांचा विमा उतरविण्यात येत होता. यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या पशुधनाला कुठलेही संरक्षण नव्हते. मात्र आता शेतकऱ्यांकडील त्यांच्या मालकीच्या जनावरांचा विमा काढण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे. - तर मिळणार जनावरांच्या किमतीची भरपाई जनावरांचा अपघाती मृत्यू झाल्यास जसे आग लागणे, अंगावर वीज पडणे, पूर, वादळ, भूकंप, दुष्काळामुळे दगावणे, सर्पदंश इत्यादींद्वारे झाल्यास जनावरांच्या किमतीची भरपाई घेण्यास लाभार्थी पात्र राहणार आहे. काही प्रमाणात अपंगत्व आल्यास जनावरांच्या किमतीच्या ७५ टक्के रकम लाभार्थी शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. जनावरांच्या कानातील बिल्ला हीच ओळख जनावरांच्या कानाला लावण्यात येणारा बिल्ला हीच जनावरांची ओळख राहणार आहे. जनावरांचा विमा प्रस्ताव तयार करताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, जनावरांच्या मालकासोबत फोटो, कानातील बिल्ला दिला जाईल. तसेच बॅँक खात्याची झेरॉक्स प्रत द्यावी लागणार आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी संपर्क साधून विमा काढता येईल. या योजनेत शेतकऱ्यांच्या सरसकट सर्वच पशुधनाला विम्याचा लाभ घेता येणार आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पशुधनाला संरक्षण देणे हा योजनेचा उद्देश आहे. सर्वच पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. - शैलेंद्र पुरी, सहा. आयुक्त, पशुसंवर्धन असा मिळणार लाभ राष्ट्रीय पशुधन विमा योजनेत एका कुटुंबाजवळ असलेल्या पाच जनावरांचा विमा एक वर्षासाठी किंवा तीन वर्षांसाठी काढता येतो. ५० हजार रुपये किमतीच्या जनावरांसाठी तीन वर्षांचा विमा काढण्यासाठी सर्वसाधारण लाभार्थीला २ हजार ६४ रुपये भरावे लागतात. लाभार्थी जर दारिद्र्यरेषेखालील अथवा अनु.जाती-जमातींचा असल्यास त्याला १ हजार ४२४ रुपये भरावे लगातात. उर्वरित रकमेचा भरणा शासन करणार आहे. या योजनेअंतर्गत गाय व म्हैस वर्ग आणि शेळी, मेंढी, ससे, डुकरे, याक, एडका तसेच ओझेवाहू जनावरे उदा. घोडे, गाढव, खेचर, ऊंट यांचा विमा काढता येतो. जिल्ह्यात साडे सहा लाख पशुधन १९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात गाय व म्हैस वर्गातील लहान जनावरांची १ लाख ८१ हजार १६८ मोठ्या जनावरांची संख्या ५ लाख १२ हजार ६० आहेत. तसेच लहान व मोठी जनावरे अशी एकूण ६ लाख ५० हजार २२८ एवढी जनावरांची संख्या आहे.