शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

आंबियाला विम्याचे संरक्षण

By admin | Updated: November 2, 2016 00:19 IST

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना यंदाच्या हंगामापासून लागू करण्यात आली.

शेतकऱ्यांना दिलासा : डाळिंब, मोसंबी, पेरू, लिंबू, केळी आदी अधिसूचित गजानन मोहोड अमरावतीप्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना यंदाच्या हंगामापासून लागू करण्यात आली. यामध्ये संत्रा, मोसंबी, लिंबू, केळी, पेरू, डाळींब आदी फळपिकांना निवडक जिल्ह्यांमध्ये आंबिया बहर व गारपीट आदी घटकांसाठी विम्याचे संरक्षण कवच लाभणार आहे. या योजनेंतर्गत निर्धारित फळपीकनिहाय प्रमाणकानुसार विमा लागू करण्यात आला आहे. अधिसूचित महसूल मंडळामध्ये केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या त्रयस्त संस्थेमार्फत स्थापन केलेल्या संदर्भ हवामान केंद्रावर नोंदल्या गेलेल्या हवामानाची आकडेवारी व फळपीकनिहाय प्रभाणके याची सांगड घालून संबंधित विमा कंपनीद्वारा शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई बँकेद्वारा देण्यात येणार आहे. कमी-जास्त पाऊस, पावसाचा खंड, वेगवान वारे, गारपीट, सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. अमरावती जिल्ह्यासाठी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स ही विमा कंपनी प्राधिकृत आहे. अधिसचित फळपिकांसाठी ज्या शेतकऱ्यांची कर्जमर्यादा मंजूर आहे. त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना सक्तीची व अन्य शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.विमा कंपनीकडून पीकनिहाय प्रति हेक्टरी प्राप्त वास्तवदर्शी विमा हप्ता दर व प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता यामधील फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजण्यात येईल व हे अनुदान केंद्र व राज्य शासनाकडून समप्रमाणात दिल्या जाणार आहे. शेतकऱ्यांनी डाळिंब व मोसंबी या फळपिकांसाठी ३१ आॅक्टोबर, पेरू, केळी व संत्रा पिकासाठी ३१ आॅक्टोबर व लिंबू या पिकासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी घोषणापत्रे विमा कंपनीकडे सादर करावयाची आहे. या योजनेत हवामान घटकाचा धोका संपल्याचे ४५ दिवसाचे आत विमा कंपनी नुकसान भरपाई अदा करणार आहे. मोसंबी पिकाकरिता अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात बडनेरा, डवरगाव, माहुली जहागीर, नांदगाव पेठ, वरूड तालुक्यात वरूड, शेंदूरजनाघाट, लोणी, पुसला, बेनोडा, वाठोडा व राजूराबाजार, मोर्शी तालुक्यात मोर्शी, हिवरखेड, शिरखेड, अंबाडा व नेरपिंगळाई, तिवसा तालुक्यात वरखेड, वऱ्हा, मोझरी तसेच धामणगाव तालुक्यात धामणगाव रेल्वे, चिंचोली व अंजनसिंगी या महसूल मंडळाचा समावेश आहे. केळीसाठी अचलपूर तालुक्यात अचलपूर, पथ्रोट, परतवाडा, परसापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात अंजनगाव, भंडारज, विहीगाव, सातेगाव, कापूसतळणी, कोकर्डा, चौसाळा, निमखेड बाजार व चौसाळा या मंडळाचा समावेश आहे. संत्र्यासाठी या महसूल मंडळाचा समावेशअमरावती तालुक्यामधील अमरावती, वडाळी, बडनेरा, नवसारी, डवरगाव, माहुली जहागीर, नांदगाव पेठ, भातकुली तालुक्यात निंभा, चांदूररेल्वे तालुक्यात चांदूररेल्वे, पळसखेड, घुईखेड, आमला विश्वेश्वर, सातेफळ, धामणगाव तालुक्यात धामणगाव, चिंचोली, भातकुली, अंजनसिंगी, मंगरुळ दस्तगीर, दत्तापूर, तळेगाव दशासर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नांदगाव, दाभा, शिवणी, मंगरुळ चव्हाळा, पापळ, लोणी, धानोरा गुरव, माहुली चोर, मोर्शी तालुक्यात अंबाडा, हिवरखेड, रिद्धपूर, धामणगाव (काटपूर), नेरपिंगळाई, शिरखेड, मोर्शी, वरूड तालुक्यात वरूड, बेनोडा, पुसला, वाठोडा, लोणी, शेंदूरजनाघाट, राजुराबाजार, तिवसा तालुक्यात तिवसा, मोझरी, वऱ्हा, कुऱ्हा, वरखेड, चांदूरबाजार तालुक्यात ब्राम्हणवाडा थडी, बेलोरा, करजगाव, शिरजगाव कसबा व तळेगाव मोहना, अचलपूर तालुक्यात अचलपूर, रासेगाव, असदपूर, परसापूर, पथ्रोट व परतवाडा, चिखलदरा तालुक्यात चिखलदरा, सेमाडोह व टेंभूरसोडा व अंजनगाव तालुक्यात अंजनगाव, भंडारज, विहीगाव, सातेगाव, कापूसतळणी व कोकर्डा या मंडळाचा समावेश आहे.