शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

विमा कंपनीची बेपर्वाई, भरपाई जमाच नाही

By admin | Updated: March 16, 2017 00:01 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १५ हजार ८८९ शेतकऱ्यांनी रबी हंगाम २०१५ मध्ये पीकविमा काढला.

शेतकऱ्यांना प्रतीक्षा : १५ दिवसांपूर्वी साडेपाच कोटींचा रबी विमा जाहीरअमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १५ हजार ८८९ शेतकऱ्यांनी रबी हंगाम २०१५ मध्ये पीकविमा काढला. यापैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजार रुपयांची भरपाई जाहीर केली. मात्र, १५ दिवसांपासून विमा कंपनीद्वारा बँकांकडे भरपाईची रक्कम जमा करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विमा कंपनीच्या बेपर्वाईमुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळू शकला नाही. रबी हंगाम २०१५ मध्ये पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची अतोनात हानी झाली. याची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी पीकविमा योजना राबविण्यात आली. जिल्ह्यातल गहू, हरभरा, सूर्यफूल, कांदा व भूईमूग या अधिसूचित पिकांसाठी जिल्ह्यातील ११७ महसूल मंडळात ही योजना राबविण्यात आली होती. जिल्ह्यात बागायती गव्हाकरिता ७५ महसूल मंडळ व हरभऱ्याकरिता ६४ महसूल मंडळात ही योजना होती. सरासरी उत्पन्नाच्या एकूण १५० टक्क्यांपर्यंत कमाल संरक्षण या योजनेत असल्यामुळे जिल्ह्यातील १५ हजार ८८९ शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. यापैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजारांचा विमा शासनाने दोन आठवड्यापूर्वी मंजूर केला. प्रत्यक्षात विमा कंपन्यांद्वारा ही रक्कम अग्रणी बँकेकडे जमा करण्यात आली नाही. त्यामुळे अग्रणी बँकेद्वारा इतर बँकांना नुकसान भरपाईची रक्कम देता आलेली नाही, असे या बँकेने सांगितले. यासंदर्भात विमा कंपनीच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी) अशी मिळणार गव्हाची भरपाई गव्हासाठी जिल्ह्यात १० लाख ७३ हजार ९९४ रुपयांची भरपाई मिळणार आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४५ शेतकऱ्यांना २८ हजार ४५४ रुपये, भातकुली तालुक्यात ७० शेतकऱ्यांना एक लाख ४५ हजार १५७ रुपये, चांदूरबाजार तालुक्यात ५० शेतकऱ्यांना एक लाख २२ हजार ३०७ रुपये, चिखलदरा तालुक्यात १३७ शेतकऱ्यांना ६ लाख ६१ हजार ९२१ रुपये, वरुड तालुक्यात १९३ शेतकऱ्यांना एक लाख १६ हजार १५५ रुपयांची भरपाई मिळणार आहे. सरासरी उत्पन्नाची आकडेवारीच ग्राह्ययोजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करताना पैसेवारी, दुष्काळ, टंचाईस्थिती यासंदर्भात शासनाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात आलेली नाही. यासाठी कृषी आयुक्तालयामार्फत सादर करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या पीक सर्वेक्षण अंदाजाच्या पीककापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पन्नाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले. त्यामुळे ही आकडेवारीच नुकसानभरपाई निश्चित करताना ग्राह्य धरली जाणार आहे. रबी २०१५ हंगामासाठी पीकविमा जाहीर झाला. मात्र, यासाठीची भरपाई विमा कंपन्यांद्वारा आतापर्यंत जमा करण्यात आलेली नाही. रक्कम जमा झाल्यास संबंधित बँकांना त्वरित वितरित करण्यात येईल. - सुनील रामटेके व्यवस्थापक, अग्रणी बँक पीकविम्याची भरपाई विमा कंपनीद्वारा लीड बँकेकडे जमा करण्यात येते. तेथून ती शेतकऱ्यांनी ज्या बँकेत विमा काढला असेल त्या बँकांमध्ये जमा करण्यात येते. तेथून शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला जातो. -दत्तात्रय मुडेजिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी