एफडीए घेणार नमुने : हानिकारक घटक, नागरिकांनी फिरवली पाठ अमरावती : ‘भूक लागलीय.. फक्त दोन मिनिट.. दोन मिनिटात स्वादिष्ट, चटपटीत मॅगी तयार’ अशा आकर्षक जाहिरातीमुळे व आगळ्या चवीमुळे आणि बनविण्याच्या अत्यंत सोप्या पध्दतीमुळे अल्पावधीत सामान्याच्या स्वयंपाकघरात हक्काचे स्थान मिळविणारे ‘मॅगी’ नुडल्स आता बहुतांश स्वयंपाकघरांमधून हद्दपार झालेत. शहरात लाखांवर नागरिक दररोज मॅगीचे सेवन करीत असल्याचे आकडे सांगतात. परंतु यात आरोग्यास अपायकारक पदार्थांचा भरणा असल्याचे तपासणीअंती सिध्द झाल्याने शहरातील बहुतांश सुजाण नागरिकांनी ‘मॅगी’ चे सेवन बंद केले आहे. शहरात मॅगीचे व्दोन डिलर असून दरदिवसाला लाखो रूपयांच्या मॅगीची शहरात विक्री होत होती. मात्र, सद्यस्थितीत ही विक्री प्रचंड मंदावली आहे. मॅगीमध्ये आढळलेल्या शरिरास हानिकारक घटकांमुळे दिल्लीसह केरळ, हरियाणा व अन्य राज्यात मॅगीविरोधी मोहीम उघडण्यात आली आहे. विविध राज्यात मॅगीच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्यात घातक असे पदार्थ आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही मॅगी विक्रीने उंच्चाक गाठला होता. मात्र, या प्रकरणानंतर मॅगीचा खप कमी झाला असून लहान मुलेही मॅगीकडे पाठ फिरवीत आहेत. विक्रेत्यांची अडचणशहरात ‘मॅगी’च्या दोन एजन्सीज असून दररोज लाखो रुपयांचा माल किरकोळ व्यवसायिकांना विकला जातो. मात्र, शासनाने मॅगीला आरोग्यास हानीकारक ठरविल्यानंतर मॅगीच्या शहरातील विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. अल्पावधीत लहान मुलांसह मोठ्यांचीही कमालीची आवडीची झालेली मॅगी आता बहुतांश घरांमधून हद्दपार झाल्याचे चित्र आहे. लहान मुलेही मॅगी नाकारात आहेत. मॅगी हा खाद्यपदार्थ शरीरास घातक असल्याचे सिध्द झाल्याने अमरावतीतही विक्री ठप्प झाली आहे. दररोज मॅगी खाणारे लोक आता मॅगीकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे. प्रदीप मेहता, मेहता ड्रायफुट संचालकमॅगीच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. दररोज येणाऱ्या आॅर्डर्स कमी झाल्या आहेत. कंपनी व सरकारी धोरणानुसार चालू.दर्शन मोहोड, मॅगी डिलर. शहरातील मॅगीचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येईल. त्यामध्ये काही आढळल्यास कारवाई करु. - मिलिंद देशपांडे, सहाय्यक आयुक्त (अन्न)
‘झटपट मॅगी’च्या विक्रीत घसरण
By admin | Updated: June 4, 2015 00:10 IST