क्षणार्धात प्रवाशांचे जीवाशी आले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:13 AM2021-01-23T04:13:51+5:302021-01-23T04:13:51+5:30

फोटो पी २२ गुरुकुंज मोझरी गुरुकुंज मोझरी : येथील श्रीगुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयासमोरील अदृश्य गतिरोधकावर खासगी बसचा भीषण अपघात होता ...

In an instant, the lives of the passengers came to an end | क्षणार्धात प्रवाशांचे जीवाशी आले प्राण

क्षणार्धात प्रवाशांचे जीवाशी आले प्राण

Next

फोटो पी २२ गुरुकुंज मोझरी

गुरुकुंज मोझरी : येथील श्रीगुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयासमोरील अदृश्य गतिरोधकावर खासगी बसचा भीषण अपघात होता होता टळला. क्षणात ५० च्या आसपास प्रवाशांचे प्राण कंठाशी आले होते. शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

अमरावतीहून नागपूरच्या दिशेने जात असलेली खाजगी प्रवासी बस गुरुकुंज मोझरी येथील श्रीगुरुदेव रुग्णालयाच्या पुढे गतिरोधकामुळे अपघातग्रस्त झाली. रस्त्यावरील दुभाजक उध्वस्त करत बस उजव्या बाजूवरून डाव्या बाजूने गेली. त्या बाजूने दुकानाची ओळ होती. चालकाच्या समयसूचकतेने अनेकांचे प्राण यावेळी वाचले. खासगी बसच्या पुढील चाकाच्या एक्सेल पट्टी तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. या रस्त्यावर डांबरीकरण करूनही गतिरोधकाची उंची आयआरबी कंपनीने वाढविली नाही व सोबतच त्यावर निर्देशक पट्टे मारण्यात आले नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी नागरिकांत चर्चा आहे.

Web Title: In an instant, the lives of the passengers came to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.