अमरावती : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१९-२० अंतर्गत येत्या १९ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान जिल्हा परिषद गटातील प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेची जिल्हास्तरीय समितीमार्फत ५९ ग्रामपंचायतींची तपासणी सीईओ अमोल येडगे, पाणीपुुरवठा व स्वच्छता विभागाचे डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी आदींच्या मार्गदर्शनात निवड समितीकडून केली जाणार आहे.
सन २०१९-२० या आर्थिक वर्षात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात राबविण्यात आली. यात तपासणीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्कलमधून प्रत्येकी एक याप्रमाणे ५९ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. या तपासणीत आता जिल्हास्तरावर प्रथम, व्दितीय आणि तृतीय याप्रमाणे तीन ग्रामपंचायत निवडल्या जाणार आहेत. पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना रोख स्वरूपात पुरस्कार दिले जाणार आहेत. यात जिल्हास्तरावर प्रथम आणि व्दितीय आलेल्या ग्रामपंचायती विभागस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरणार आहेत.
बॉक्स
या ग्रामपंचायतींची होणार तपासणी
अमरावती तालुक्यातील सालोरा खु, मासोद, डवरगाव, सुकळी, टेंभा, अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा, कांडली,प बोपापूर, असदपूर, परसापूर, अंजगाव सुर्जीमधील कोतेगाव, खोडगाव, कारला, चांदूर रेल्वेमधील धानोरा म्हाली, बोरी, मांडवा, मोर्शी तालुक्यातील डोमक, तळेगाव, शिरूर, सावरखेड, डोंगरयावली, तिवस्यातील तळेगाव ठाकूर, शेंदोळा बु, घोटा,चांदूर बाजार तालुक्यातील नानाेरी, कुऱ्हा, निंभोरा, तळवेल, गोंविदपूर, सुरळी,वरूडमधील पिंपळखुटा, बहादा, बाभुळाखेडा, सावंगी, गाडेगाव, नांदगावमधील पाळा, मोखड, पापळ, एरंडगाव, धामणगावमधील ढाकुलगाव, आष्टा, गिरोली, काशिखेड, धारणीमधील राणीगाव, तंबोली, झापल, रत्नापूर, काटकुंभ, दर्यापूरमधील पनोरा, शिंगणापूर, वरूड बु,चिखलदरा तालुक्यातील बारूगव्हाण, अंबापाटी, आमझरी, आडनदी, भातकुलीतील पोहरा पूर्णा, कामनापूर, उत्तमसरा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
बॉक्स
पाच जणांची समिती
स्वच्छता अभियानातील ग्रामपंचायतींची तपासणी करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकणी, पाणीपुरवठा विभागाने कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणमले आणि वरिष्ठ भुवैज्ञानिक आदींचा तपासणी समितीत समावेश आहे.