शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टिग्रस्त भागांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अतिवृष्टीमुळे घरांची व शेतीची मोठी हानी झाली. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. ...

ठळक मुद्देहानिग्रस्त कुटुंबांचे सांत्वन; नुकसानग्रस्तांना शक्य ती सर्व मदत मिळवून देऊ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अतिवृष्टीमुळे घरांची व शेतीची मोठी हानी झाली. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. आपद्ग्रस्तांना शक्य ती सर्व मदत मिळवून देऊ, असे पालकमंत्री  यशोमती ठाकूर यांनी सांगितले.पालकमंत्री ठाकूर यांनी गुरुवारी खारतळेगाव, रामा, साऊर, टाकरखेडा संभू आदी अतिवृष्टिग्रस्त भागाची पाहणी केली. ग्रामीण नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पालकमंत्र्यांनी यावेळी खारतळेगाव येथील अतिवृष्टीने आलेल्या पुरात वाहून गेलेल्या युवकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना तात्काळ मदत, सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश दिले. उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार नीता लबडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

शासन पूरग्रस्तांच्या खंबीरपणे पाठीशीखारतळेगाव येथील पुरात प्रवीण गुडधे, निरंजन गुडधे हे युवक वाहून गेले. या दोहोंच्या कुटुंबीयांची भेट घेऊन पालकमंत्र्यांनी त्यांची व्यथा जाणून घेतली व सांत्वन केले. आपण स्वत: एक कुटुंबीय म्हणून या कुटुंबाच्या कायम पाठीशी राहू. या कुटुंबांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशा शब्दांमध्ये पालकमंत्र्यांनी दिलासा दिला. यावेळी पालकमंत्र्यांकडूनही १० हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात आली.

भरपाईसाठी सविस्तर प्रस्ताव पाठवाअतिवृष्टीने रामा येथे भिंतीची पडझड तसेच धान्य, कडबा यांचे नुकसान झाले. साऊर येथेही अतिवृष्टीने नुकसान झाले. या गावांतील घरांच्या पडझडीबाबत पंचनामे करण्यात आले.  शेतीच्या नुकसानाचेही परिपू्र्ण व सविस्तर पंचनामे करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

रेणुका नाल्याचे खोलीकरण आवश्यकटाकरखेडा संभू येथील रेणुका नाला व इतर परिसराची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. काही वर्षांपूर्वी त्यांच्या प्रयत्नाने नाला खोलीकरणाचे काम झाले होते. त्यामुळे पूरहानीचे प्रमाण कमी झाले होते. पुन्हा नाला खोलीकरण करण्यात मदत देऊ, असे  पालकमंत्री म्हणाल्या.

पूरसंरक्षणासाठी उपाययोजनापूरसंरक्षण भिंत, नाला खोलीकरण,  चांगले पांदण रस्ते आदी विविध कामे हाती घेण्यात येतील. अशा कामांसाठी आवश्यक निधी मिळवून देऊ, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. एकही पात्र व्यक्ती भरपाईपासून वंचित राहू नये, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर