शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"ट्रायबल"च्या इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांची तपासणी आणि गुणांकन बंद

By गणेश वासनिक | Updated: January 19, 2024 18:45 IST

मुंबई येथे मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय गावित यांच्या अध्यक्षतेखाली २ जानेवारी २०२४ रोजी नामांकित शाळांच्या प्रश्नाविषयी महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांची तपासणी आणि गुणांकन प्रक्रिया आता बंद करण्यात आली आहे. यापुढे मंजुर विद्यार्थी संख्येनुसार शाळांना शुल्क मिळणार असल्याने या निर्णयामुळे राज्यातील खासगी शैक्षणिक संस्था चालकांवर राज्य सरकार मेहरबान असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई येथे मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय गावित यांच्या अध्यक्षतेखाली २ जानेवारी २०२४ रोजी नामांकित शाळांच्या प्रश्नाविषयी महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोविड काळातील सन २०२०-२०२१ आणि २०२१-२०२२ या वर्षाचे नामांकित शाळांच्या थकीत शिक्षण शुल्कावर चर्चा करण्यात आली. हे थकीत शुल्क आता नाशिक येथील आयुक्त कार्यालयातून अदा करण्याचा निर्णय झाला आहे. राज्यात जुन्या नामांकित शाळांची तपासणी, गुणांकन यापुढे होणार नाही, असे ठरविण्यात आले. तसेच या शाळांना पूर्वीच्याच गुणांकनानुसार शुल्क अदा करण्यात येणार आहे. नवीन प्रस्ताव प्राप्त शाळांचे गुणांकन प्रथम वर्षीच करण्यात येईल. नामांकित शाळांची तपासणी ही वर्षातून दोन वेळा करण्यात येणार असली तरी ज्या प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ही शाळा आहे त्याच प्रकल्प अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाणार आहे. २०२४-२०२५ या वर्षापासून ग्रेडेशन बंद होऊन पहिली ते बारावीपर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क निश्चित करण्यात आले आहे. नामांकित शाळांचे सन २०२३-२४ या वर्षाचे ५० टक्के शैक्षणिक शुल्क दिले जाणार आहे. या बैठकीला नामांकित शाळांचे प्रतिनिधी मनोज हिरे, डॉ. सुधीर जगताप, रवींद्र पाटील, अनिल रहाणे, सुभाष चौधरी हे हजर होते.अपर आयुक्तांचे अधिकार गोठविले

आदिवासी विकास विभागाच्या नागपूर, ठाणे, अमरावती व नागपूर येथील अपर आयुक्तांकडे इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांची तपासणी, गुणांकनाबाबत असलेले अधिकारी या नव्या निर्णयाने गोठविले आहे. आता नामांकित शाळांच्या संचालकांच्या प्रकल्प अधिकारी ते नाशिक येथील आयुक्त कार्यालय असा फाईलींचा प्रवास असणार आहे. अपर आयुक्त कार्यालयातील हस्तक्षेप रोखण्यात आला आहे.

 

टॅग्स :Amravatiअमरावती