शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

३९८ गावांमध्ये माती नमुन्यांची तपासणी

By admin | Updated: June 1, 2015 00:42 IST

नैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद परीक्षण व सर्वेक्षणाच्या आधारे खतांच्या संतुलित वापरासाठी राज्यात मृद ...

मृद आरोग्य अभियान : १७ हजार नमुने तपासणारगजानन मोहोड अमरावतीनैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद परीक्षण व सर्वेक्षणाच्या आधारे खतांच्या संतुलित वापरासाठी राज्यात मृद आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत दर तीन वर्षांत एकदा शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ३९८ गावांमध्ये १७ हजार ७४७ मृद नमुन्यांच्या तपासणीचे कृषी विभागाचे नियोजन आहे. अमरावती तालुक्यातील १ हजार २६३, भातकुली १ हजार २७४, चांदूररेल्वे १ हजार २९७ व तिवसा तालुक्यातील १ हजार २७२ नमुन्यांची जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा अमरावती येथे तपासणी होणार आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातही १ हजार २७०, दर्यापूर तालुक्यातील १ हजार २७०, अंजनगाव सुर्जी १ हजार २७८, मोर्शी १ हजार २८२ व वरुड तालुक्यातील १ हजार २७० अशा एकूण ६ हजार ३७१ मृद नमुन्यांची तपासणी माती, पाणी परीक्षण प्रयोगशाळा कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथे केली जाणार आहे. धामणगाव तालुक्यामधील १ हजार २२०, चांदूरबाजार तालुक्यातील १ हजार २६९, अचलपूर तालुक्यामधील १ हजार ५५२, धारणी तालुक्यामधील १ हजार २६८ व चिखलदरा तालुक्यातील ९६१ अशा एकूण ६ हजार २७० मृद नमुन्यांची तपासणी माती, पाणी परीक्षण प्रयोगशाळा कृषी विज्ञान केंद्र घातखेड येथे होणार आहे. जिल्ह्यातील ३९८ गावामधील ६ हजार २०३ बागायती मृद नमुने व ११ हजार ५४४ जिरायती मृद नमुने तपासण्यात येणार आहेत. अन्य ५५ गावे प्रतीक्षा यादीत आहेत. केंद्र शासनाच्या स्वाईल हेल्थ कार्ड या अभियानामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीतील मातीचे आरोग्य तपासता येणार आहे. खतांच्या वापराने बिघडतो जमिनीचा पोतसिंचनाच्या सुविधा वाढत असल्याने शेतकऱ्यांचा कल वर्षभरात दोन ते तीन पिके घेण्याकडे दिसून येतो. उत्पादन वाढविण्यासाठी जैविक व नैसर्गिक खतांऐवजी रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत आहे. या खतांच्या वापराने व अधिक पिके घेण्याच्या प्रकारामुळे जमिनीचा पोत बिघडून ती कडक होते व जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढते. यासाठी मातीचे परीक्षण करून कोणत्या घटकांची कमतरता आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. यामुळे कमतरता भरून काढण्यास मदत होते. मातीमध्ये आहेत१६ ते २० घटकजिल्ह्यातील मातीमध्ये १६ ते २० घटक आढळून येतात. यामध्ये नत्र व स्फुरद कमी आहेत. याशिवाय सुक्ष्म खते, गंधक, झिंक, लोह, मॅग्नीज, मॅग्नेशिअमसारखे अनेक घटक कमी आढळून आल्याने पीक उत्पादनात घट येते.