शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांत ६१० शेतकऱ्यांना कीटकनाशकाची विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:19 IST

कीटकनाशकांची फवारणी करताना सहा वर्षांत ६१० शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त आहे. यामध्ये सर्वाधिक २०९ शेतकऱ्यांना मागील वर्षी विषबाधा झाली.

ठळक मुद्देशासनाचा अहवाल : यंदा पाच महिन्यांत ९५ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कीटकनाशकांची फवारणी करताना सहा वर्षांत ६१० शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त आहे. यामध्ये सर्वाधिक २०९ शेतकऱ्यांना मागील वर्षी विषबाधा झाली. यामध्ये तीन जनांचा मृत्यू झाल्याचे वास्तव आहे. कीटकनाशक कंपन्यांद्वारा शेतकºयांना सुविधेची साधने पुरवीत नसल्यानेच फवारणी शेतकºयांच्या जीवावर उठली असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत ५०५ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकाची विषबाधा झाली. यामध्ये २०१२ मध्ये ७२, सन २०१३ मध्ये ५५, सन २०१४ मध्ये ६२, सन २०१५ मध्ये ५७, सन २०१६ मध्ये ५० तर सन २०१६ मध्ये सर्वाधिक २०९ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकांची विषबाधा झाली. मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात २० तर विदर्भात ३५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर कीटकनाशकांचा फवारणी ही मृत्यूचीच फवारणी असल्याची बाब प्रथम उघडकीस आली. त्यानंतर शासनाने याविषयी गांभीर्याने घेणे सुरू केले आहे. कृषी विभागाद्वारा याविषयी जनजागृती करण्यात येत असली तरी यावर प्रभावी अंलबजावणी नसल्यामुळेच सध्याही शेतकरी विषबाधित होत असल्याचे वास्तव आहे.पेरणीनंतरच्या चार महिन्यांमध्येच मोठ्या प्रमाणवर विषबाधितांचे प्रकरण समोर येत आहेत. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ६, फेब्रुवारी ३, मार्च ५, एप्रिल ३, मे ६, जून १०, जुलै १७, आॅगस्ट ३५, सप्टेेंबर ६२ आॅक्टोबर ३२, नोव्हेंबर २६ व डिसेंबर महिन्यात ४ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.२.१० लाखांच्या साठ्यास विक्रीबंदचे आदेशगुण नियंत्रण पथकाने जिल्ह्यातील कीटकनाशकांचे १२२ सॅम्पल घेतले. यामध्ये ५ नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले. ९१५ परवान्यांची तपासणी केली असता ५५७ मे.टन साठ्यास विक्रीबंदचे आदेश देण्यात आले. याची किमंत २.१० लाख आहे. विभागीय गुण नियंत्रण पथकाने अखेर ही कारवार्ई केल्याचे कृषी विभागाने सांगितले.