अमरावती : एसटी महामंडळ आणि एसटीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तपासणी मोहीम सुरू केली आहे.
एसटी प्रवासा दरम्यान विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम ऑन दि स्पॉट वसूल केली जाणार आहे. यामुळे एसटीचा प्रवास विनातिकीट करू नका आणि दंड भरू नका, असा सल्ला राज्य एसटी महामंडळाने दिला आहे. प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर अशी १५ दिवस तिकीट तपासणी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत विभागातील छोट्यातील छोट्या बस मार्गावर तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी तपासणीसाठी सज्ज करण्यात आले आहेत. हे सर्व अधिकारी विनातिकीट प्रवास या विरोधात तपासणी मोहिमेसोबत जनजागृती करणार आहेत. याकरिता एसटी महामंडळाने विभागात ६ पथके नेमली आहेत. या पथकामार्फत विविध मार्गावर एसटी बसेसची तपासणी मोहीम राबविली जात आहे.
बॉक्स
विनातिकीट प्रवास थांबविण्यासाठी मोहीम
छोट्या छोट्या गावातून प्रवास करणाऱ्या आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बहुदा तिकीट काढण्याची सवय अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गर्दीची संधी साधून तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडत असून अशा नागरिकांना दुप्पट दंडाच्या स्वरूपात शिक्षा मिळाली तर ते पुन्हा असे प्रकारच्या वर्तनाला आळा घालतील, या दृष्टिकोनातून ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.