शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायग्रस्त आरोग्य सेविका रस्त्यावर

By admin | Updated: September 20, 2016 00:18 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अख्यत्यारित येणाऱ्या मेळघाटात मागील आठ ते नऊ वर्षा पासून सेवा देणाऱ्या ..

 जिल्हा परिषदेसमोर उपोषण : बदली आदेश देण्याची मागणीअमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अख्यत्यारित येणाऱ्या मेळघाटात मागील आठ ते नऊ वर्षा पासून सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांना बदलीनंतर कार्यमुक्त करण्यात न आल्याने १९ सप्टेंबरपासून या अन्यायग्रस्त आरोग्य सेविकांनी झेडपी समोर उपोषण सुरू केले आहे.मेळघाटातील २२ आरोग्य सेविकांची जिल्हा परिषद आरोग्य विभागाने २४ मे १५ रोजी रितसर मेळघाट क्षेत्राबाहेर बदल्या केल्या आहेत. यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ११ मे रोजी आरोग्य सेविकांचे समुपदेशनाव्दारे मेळघाट व दुर्गम भागातून बदल्या करून याबाबत आदेश पारित केले आहेत. मात्र या बदल्या करण्यात आलेल्या आरोग्य सेविकांना जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यमुक्त केले नाही. या प्रकाराला वर्षभराचा कालावधी लोटून गेल्यावरही निर्णय घेण्यात आला नाही. अशातच कार्यमुक्त करण्यासाठीचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने काढावा, याकरिता अनेकवेळा निवेदन व अधिकाऱ्यांना भेटूनही निर्णय न झाल्याने या अन्यायग्रस्त आरोग्य सेविकांनी जिल्हा परिषदे समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात पद्मा जाधव, चंदा बेलसरे, पल्लवी इंगोले, ललिता मेश्राम, सुकेशनी करूणाधन, पुष्पा परांजपे, पुष्पा रामटेके, प्रिती तसरे, सुनीता मेश्राम, अश्र्विनी गुल्हाने,वर्षा वानखडे, संगिता शहाणे, ज्योती धर्माळे आदींचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडेआरोग्य सेविकांच्या बदली आदेश देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याकडे सादर केला आहे. त्यानुसार हा प्रस्ताव मान्यतेसाठी सीईओंनी विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.