शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

मोरचूंदवासीयांचा दारूबंदीसाठी पुढाकार

By admin | Updated: January 30, 2016 00:20 IST

तालुक्यातील मोरचूंद या गावात अवैध दारूविक्री राजरोसपणे केले जात आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे.

निवेदन : दारुबंदीसाठी महिलांनी कंबर कसलीवरूड : तालुक्यातील मोरचूंद या गावात अवैध दारूविक्री राजरोसपणे केले जात आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. वृध्दांपासून तर युवक, आणि शाळकरी मुलेसुध्दा व्यसनाधीन होत असल्याने चिंतेच सावट पसरले आहे. अनेक मुलांचे विवाह सोहळ्यामध्येसुध्दा आडकाठी येत असल्याने सामाजिक कार्यातसुध्दा बाधा येत असल्याने महिलांनी परिसरातील दारूविक्री बंद करण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी शेकडो महिलांनी ठाणेदार अर्जुन ठोसरे यांना निवेदन देऊन तातडीने दारुबंदी करा, अन्यथा तीव्र आंदोलन छडण्याचा इशरा दिला आहे. निवदेनानुसार गत एक वर्र्षापासून वरुड तालुक्यातील मोरचंूद या गावात अवैध दारू विक्री राजरोसपणे होत असून याकडे पोलिसांचे लक्ष वेधणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तरुणाई तसेच शाळकरी मुलेसुद्धा दारुच्या आहारी गेली आहेत. गावातील तरुण दारुच्या आहारी गेल्याने याचा विपरीत परिणाम होऊन विवाह संबंधामध्येसुध्दा आडकाठी येऊ लागली लग्नसुध्दा जुळणे कठीण झाले. वृध्दापासून तर तरुणाईपर्यंत अगदी सर्व दारुच्या व्सनाधिन झाले . अनेकांचे पारिवारी्र भांडणे आणि पत्नी , पत्नीचे वाद चव्हाटरुावर येवून संसार उध्वस्त व्हायला लागले आहे. याबबात अनेक वेळा तक्रारी करुनही दारुबंदी झाली नाही . अखेर दारु विक्री बंद करावी याकरीता गावातील महिलांनी कंबर कसली असून एल्गार पुकारला आहे. याबबात वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अर्जून ठोसरे यांना शेकडा ेमहिलसह स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देवून तातडीने दारुबंदी करावी अशी मागणी केली असून दारुबंदी झाली नाही तर स्वाभीमानी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येवून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे. निवेदन देतेवेळी स्वाभीमानी येतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश राऊत, शाम ठाकरे, मनोज मानकर, पप्पू शेळके, सुनील शेळके, राजेश लायबरे, पंडित पाचपोहर, गुणवंता मानकर, गणेश ठाकरे, धम्मपाल धाडसे, अशोक वानखडे, अनिल मानकर, छबू कोरडे, जयश्री कोरडे, वच्छला मोहाड, सीमा काळे, रंजना वाघसह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)