शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात होणार तीन नवीन पोलीस आयुक्तालये, रणजित पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 18:48 IST

 लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.

अमरावती- लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड व ठाणे येथील मीरा भार्इंदर या ठिकाणी पोलीस आयुक्तालये स्थापन करण्याच्या प्रस्तावावर राज्य शासन विचाराधीन आहे.  

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार गुन्हेगारीही वाढत आहे. यावर अंकुश ठेवणे आणि गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी मनुष्यबळ व कार्यालयीन क्षेत्र कमी पडत आहे. अशावेळी पोलीस यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र, मनुष्यबळाअभावी गुन्हेगारीवर अंकुश बसविणे कठीण जात आहे. या अनुषंगाने राज्यातील तीन ठिकाणी नवीन पोलीस आयुक्तालय देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. १५ ते २० वर्षांपासून हे प्रस्ताव प्रलंबित असून आता या प्रस्तावातील सर्व बाबींची पडताळणी सुरू आहे. राज्य शासन पुढील कार्यवाहीची दिशा ठरविणार आहे.   

पोलीस वसाहतीसाठी ५०० कोटींचा निधीराज्यातील पोलीस वसाहतीसाठी ५०० कोटींचा निधी प्राप्त झाला असून मुंबईसह अन्य काही ठिकाणच्या वसाहतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. २ लाख मनुष्यबळाच्या अनुषंगाने या वसाहतीचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती रणजित पाटील यांनी दिली. 

महाराष्ट्रात आणखी तीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना केली जाणार आहे. तेथील केसेस, लोकसंख्या आणि मनुष्यबळाची आवश्यकता यावर सर्व बाबी अवलंबून राहणार आहे. - रणजित पाटील, गृहराज्यमंत्री