शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

५५ लाखांच्या गांजाची माहिती बडनेरातून ‘लीक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:02 IST

नागपूर-मुंबई हायवे क्रमांक ६ वर लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ जून रोजी पकडल्या गेलेल्या ट्रकमधून ५५ लाखांच्या गांजाचे मोठे घबाड उघडकीस आले. ही माहिती बडनेरातूनच फुटल्याची आणि येथेच अमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे रॅकेट असल्याची माहिती सूत्रांकडून ‘लोकमत’ला प्राप्त झाले.

ठळक मुद्देट्रकचे अपहरण पोलिसांच्या पथ्यावर : २९ जून पर्यंत पीसीआर, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

चेतन घोगरे।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागपूर-मुंबई हायवे क्रमांक ६ वर लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ जून रोजी पकडल्या गेलेल्या ट्रकमधून ५५ लाखांच्या गांजाचे मोठे घबाड उघडकीस आले. ही माहिती बडनेरातूनच फुटल्याची आणि येथेच अमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे रॅकेट असल्याची माहिती सूत्रांकडून ‘लोकमत’ला प्राप्त झाले.लोणी पोलिसांनी नागपूर-मुंबई हायवेवर २५ जूनच्या रात्री केलेल्या नाकाबंदीदरम्यान ट्रक क्रमांक एच.आर. ४६ सी १६५७ थांबवून तपासणी करण्याचा प्रयत्न केला असता, चालक व एक साथीदार पसार झाले. पण, त्या ट्रकातील एका इसमास पोलिसांनी अटक करून ट्रकची झडती घेतली. यावेळी ५५ लाखांचा १० टन गांजा आढळून आला. तथापि, हा ट्रक पकडला जाण्याच्या मागे वेगळेच कारण आता पुढे आले आहे.सूत्रांनुसार, नागपूर-मुंबई हायवेवरून हा ट्रक बडनेरा शहरापासून जात असताना काही इसमांनी तो शेतात वळवून चालक व क्लीनरला बांधून ठेवले. या ट्रकमधल्या केळीच्या घळाखाली गांजाचे पोते भरून अन्य चालक व इतर साथीदारांच्या मदतीने नियोजित ठिकाणी रवाना करण्यात आला होता.दरम्यान, आधीच्या चालकाने कशीबशी सुटका करून मालकाशी संपर्क करून ट्रक लंपास करण्यात आल्याची माहिती दिली. ट्रकमालकाने अमरावती ग्रामीण नियंत्रण कक्षाला माहिती देऊन बडनेरा हद्दीतून ट्रक पळविला गेल्याची माहिती दिली. त्यानंतर अमरावती ग्रामीण हद्दीतील लोणी पोलीस स्टेशन व अकोला जिल्ह्यातील माना-कुरूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हायवे रोडवर नाकाबंदी करण्यात आली. हा ट्रक साई रिसॉर्टजवळ अडविण्यात आला. या मोहिमेस ट्रकची जीपीएस यंत्रणा महत्त्वाची दुवा ठरली. तपासणीदरम्यान दोन आरोपी पोलिसांना चकमा देवून पसार झाले. मात्र, एक आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. घटनाक्रमाबाबत काहीच माहीत नसल्याचे त्याने सांगितले. त्या आरोपीला लोणी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याला २९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या घटनाक्रमात एक हजार किलो गांजा बडनेरातून रवाना करण्यात आल्याने येथे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे उघड झाले.मध्यस्थी करणारा अधिकारी कोण ?५५ लाखांचा गांजा पकडल्यावर पोलीस विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ट्रक सोडण्यासाठी देवाण-घेवाण करण्याचा मोठा प्रयत्न केला. मध्यस्थी करणारा हा अधिकारी कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे.गांजाच्या कारवाईत श्रेयाचे राजकारणएवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा पकडला गेल्यावर अमरावती ग्रामीण पोलीस दलातील काही घटकांमध्ये श्रेयाचे राजकारण चालले होते. कारवाई आम्हीच केली असे एकमेकांना ठणकावून सांगितले जात होते.