गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 06:00 AM2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:01:01+5:30

कीटकनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी व संध्याकाळी हवेच्या दिशेने करावी. संरक्षण किटशिवाय फवारणी करु नये, कीटकनाशकांची हाताळणी करताना सदैव जागृत राहावे, शेतकरी किंवा शेतमजुराने उपाशीपोटी फवारणी न करता न्याहारी करावी, सलग दिवस फवारणी करू नये, आजारी किंवा शरीराला जखम असल्यास अश्या व्यक्तीने फवारणी करू नये.

Influence of pink bonds | गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भाव

गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भाव

Next
ठळक मुद्देकृषी विभाग : फेरोमेन ट्रॅप, लाईट ट्रॅप, निमअर्काची फवारणी आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. समाधानकारक पावसाने पिकाची वाढ होत आहे. पीक पात्या फुलोरावर असल्याने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्याकरिता प्रति हेक्टरी ५ फेरोमन ट्रॅपचा वापर करणे, लाईट ट्रॅप लावणे, निम अर्काची फवारणी करणे, वेळीच गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन व डोमकळी नष्ट करणे महत्वाचे असल्याची माहिती कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली.
सद्यस्थितीत कपाशी पीक फुलोरा येण्याच्या अवस्थेत असून यंदा देखील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभाग, प्रादेशिक संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र आदीच्या मार्गदर्शनात उपाययोजना करणे महत्वाचे आहे.
मागील वर्षी खरीप हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये कीटकनाशके फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाल्याचे दिसून आले. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकरी, शेतमजुरांना फवारणीमुळे विषबाधा होवू नये याकरिता सावध राहून खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता कीटकनाशके खरेदी करताना पिकावरील येणाऱ्या किडीकरिता शिफारशीत कीटकनाशकाची खरेदी परवानाधारक कृषी केंद्रातूनच करावी. कीटकनाशके खरेदीचे पक्के बिल घ्यावे, फवारणी करताना विषबाधा झाल्यास प्रथमोपचार करून ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होवून उपचार करून घ्यावा, कीटकनाशके फवारणी करताना कृषी विभागामार्फत तालुकास्तरीय व गावस्तरीय तसेच शेतीशाळेकडून होत असलेल्या मार्गदर्शनाचा फायदा घ्यावा. सर्व शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व कृषी विभागाद्वारा शेतकरी, शेतमजुरांना करण्यात येत आहे.

फवारणी करताना खबरदारी आवश्यक
कीटकनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी व संध्याकाळी हवेच्या दिशेने करावी. संरक्षण किटशिवाय फवारणी करु नये, कीटकनाशकांची हाताळणी करताना सदैव जागृत राहावे, शेतकरी किंवा शेतमजुराने उपाशीपोटी फवारणी न करता न्याहारी करावी, सलग दिवस फवारणी करू नये, आजारी किंवा शरीराला जखम असल्यास अश्या व्यक्तीने फवारणी करू नये. तसेच जे मजूर फक्त कीटकनाशके फवारणीचे काम करतात त्यांनी आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Web Title: Influence of pink bonds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती