शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

‘हॉटस्पॉट’बाहेर झाला शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:01 IST

जिल्ह्यात एका आठवड्यात ५० वर नागरिक कोरोना संक्रमित झाले आहेत. यामध्ये नव्याने काही भागात रुग्ण आढळत असताना, त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री आरोग्य यंत्रणेला मिळालेली नाही. किंबहुना शहरात कोरोनाचा शिरकाव झाला कुठून, हे शोधण्यात महिन्याभरानंतरही प्रशासनाला अपयश आले आहे. २ एप्रिलला होम डेथ झालेल्या हाथीपुऱ्यातील ४८ वर्षीय आर्मेचर मेकॅनिकची कुठलीही टॅव्हल हिस्ट्री नाही.

ठळक मुद्देकोरोनाबाधित ७० : मृतांची संख्या ११, कोरोनामुक्त ५, ५४ वर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील क्लस्टर झोनव्यतिरिक्तही कोरोना पाय पसरू लागला आहे. नव्या आठ ठिकाणी कोरोना संक्रमित आढळल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. शहरात सहा नवे कंटेनमेंट व जिल्हा ग्रामीणमध्ये आता दोन ठिकाणी बफर झोन जाहीर करण्यात आल्याने यंत्रणेवरचा ताणही वाढला आहे.जिल्ह्यात एका आठवड्यात ५० वर नागरिक कोरोना संक्रमित झाले आहेत. यामध्ये नव्याने काही भागात रुग्ण आढळत असताना, त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री आरोग्य यंत्रणेला मिळालेली नाही. किंबहुना शहरात कोरोनाचा शिरकाव झाला कुठून, हे शोधण्यात महिन्याभरानंतरही प्रशासनाला अपयश आले आहे. २ एप्रिलला होम डेथ झालेल्या हाथीपुऱ्यातील ४८ वर्षीय आर्मेचर मेकॅनिकची कुठलीही टॅव्हल हिस्ट्री नाही. येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे ३१ दिवसांत नवा रुग्ण आढळलेला नसल्याने या भागात कोरोनाची साखळी तुटली. मात्र, इतर भागात कोरोना झपाट्याने वाढू लागलेला आहे. बुधवारी एका संक्रमित महिलेचा मृत्यू झाल्याने मृत बाधितांची संख्या ११ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्या आता ७० झाली आहे.शहरात सद्यस्थितीत ताजनगरला ८, हनुमाननगर ६ व खोलापुरी गेट ९ तसेच अमरावती तालुक्यात शिराळा येथे ५ रुग्ण आढळल्याने हा भाग आता ‘कोरोना हॉटस्पॉट’ बनला आहे. क्लस्टर हॉटस्पॉटमध्ये नियमांचे उल्लंघन होत असताना पोलीस याबाबत गंभीर नाहीत. त्यामुळे कोरोनाची साखळी ब्रेक होणार कशी, असा अमरावतीकरांचा सवाल आहे.एसआरपीएफ केव्हा?शहरात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांची मागणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी एक आठवड्यापूर्वी केली. मात्र, हिंगोली, मालेगाव आदी ठिकाणी बंदोबस्तावरील एसआरपीएफचे जवान संक्रमित झाल्याने संपूर्ण तुकडी क्वारंटाइन करण्यात आलेली आहे. परिणामी जिल्ह्यात ही अतिरिक्त सुरक्षा मिळणे कठीण झाल्याने शहरात स्थानिक पोलिसांच्या बळावरच कठोर निर्बंध अंमलात आणावे लागणार आहेत.शहरात नव्या भागात संक्रमण; चिंता वाढलीशहरातील आधीच्या बफर झोनबाहेरही आता कोरोना संक्रमण वाढले आहे. बडनेरात जुनी वस्ती व नव्या वस्तीत कुरेशीनगर, अमरावतीमध्ये कंवरनगर, मसानगंज, जुना कॉटन मार्केट व हबीबनगर या ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाला. अशीच स्थिती कायम राहिल्यास शहरात समूह संक्रमण होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.वलगाव पोलीसकरतात तरी काय?वलगाव ठाण्याच्या हद्दीत शिराळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जुगार सुरू होता व यामधूनच कोरोनाचा शिरकाव झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. किंबहुना जिल्हाधिकाऱ्यांकडे याविषयी तक्रारदेखील झालेली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील या गावामध्ये जुगाराला कुणाचे पाठबळ होते, याचा शोध घ्यायला हवा. अशा स्थितीत गावागावांत ‘कोरोना हॉटस्पॉट’ तयार होण्याची भीती निर्माण झालेली आहे.

प्रशासन माहिती दडवते का?वरूडमध्ये महसूल प्रशासनातील एका अधिकाऱ्याच्या वाहनचालकाच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला व त्यानंतर क्वारंटाइन करण्यात आलेल्या त्यांच्या मुलाचा निगेटिव्ह, तर दोन मुलींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे या वाहनचालकाच्या दैनंदिन संपर्कातील अधिकारी व त्यांच्या संपर्कात असलेले अन्य अधिकारी सेल्फ क्वारंटाइन झालेत. या अधिकाऱ्यांच्या स्वॅबचे अहवाल काय आहेत, ही माहिती जाहीर करणे महत्त्वाची असताना प्रशासन ती दडवित असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या