जिल्हा कोविड रुग्णालयात १४१ व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ७४ व कोविड केअर सेंटरमध्ये ९९० बेड रिक्त आहेत. जिल्ह्यात रोज ३५० ते ४०० दरम्यान अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. यामध्ये ६० टक्क्यांवर रुग्ण होम आयसोलेशनचा पर्याय निवडत आहेत व उर्वरित रुग्णांमध्ये ८ ते १० टक्के प्रमाणात गंभीर रुग्णांची नोंद होते. यामध्ये काही खासगी रुग्णालयात दाखल होत आहेत. याशिवाय रोज ३०० ते ३५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. जिल्ह्यात नोंदविल्या गेलेल्या ५१,९२३ कोरोनाग्रस्तांपैकी ४८,०५३ जणांना संक्रमणमुक्त करण्यात आले. ही टक्केवारी ९२.५९ आहे. जिल्ह्यात १०१३ सक्रिय रुग्णांच्या तुलनेत १८०७ बेड रिक्त आहेत. त्यामुळे अन्य जिल्ह्यांतील रुग्ण येथे उपचारार्थ दाखल होत आहेत. शनिवारी नागपूर येथून ३१ गंभीर रुग्ण येथील जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
अमरावतीमध्ये संसर्गाचा ग्राफ माघारला, १८०७ बेड रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST