शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

देशातील पहिल्या डिजिटल संत्रा मंडईला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 17:38 IST

वरुडात बाजार समिती आणि फ्रूटएक्स कंपनीचा उपक्रम, दिवसाला १०० टन लिलाव

- संजय खासबागे

वरूड (अमरावती) : संत्राबागांवर रोगराई ओसरल्यानंतर आता अवकाळी पावसामुळे बहराला ताण न बसणे आणि त्यातच निर्यातीतील अडचणी असल्याने व्यापाऱ्यांकडून मिळत असलेला कमी दर या बाबीतून होणारी संत्राउत्पादकांची कुचंबणा थांबविण्यासाठी देशातील पहिली संत्रा डिजिटल मंडई वरुडात स्थापन झाली आहे. शेतकऱ्यांना आणलेल्या संत्र्याला ग्रेडेशननुसार वेगवेगळ्या वर्गवारीत टाकले जात असल्याने किरकोळ संत्र्यालाही हमखास दर येथे मिळत आहे. खासगी संस्थेच्या सहकार्याने उभारलेल्या या उपक्रमामुळे संत्रा उत्पादकांना नवसंजीवनी मिळाली आहे. 

वरूड, मोर्शी तालुक्यात आंबिया आणि मृग बहारच्या संत्र्याचे हजारो टन उत्पादन घेतले जाते. परंतु ऐनवेळी परप्रांतासह बांगलादेशात भाव कोसळले की, याचा फटका थेट संत्रा उत्पादकांना बसतो. यंदा व्यापारीदेखील संत्राबागेकडे फिरकले नसल्याचे चित्र आहे. हे टाळण्यासाठी डिजिटल संत्रा मंडईसाठी वरूड कृषिउत्पन्न बाजार समिती आणि फ्रूट एक्स कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.

कंपनीकडून स्थापित यंत्रातून संत्र्याचे आकारानुसार ग्रेडिंग करून ते क्रेटमध्ये आपोआप पडतात. त्यानंतर त्याचा देशाच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित व्यापारी तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्यामार्फत लिलाव केला जातो. यामुळे संत्र्याला चांगला दर मिळत आहे. देशातील पहिली डिजिटल संत्रा मंडई म्हणून येथील बाजार समितीच्या संत्रा मंडईला मान मिळाला. ग्रेडेशनमुळे टाकाऊ संत्रीसुद्धा विकली जात आहेत. याचा संत्रा उत्पादकांना फायदा होत असून दिवसाला १०० टन संत्री विकली जात आहेत. 

देशांतर्गत सफरचंदासह विविध फळांचे ग्रेडेशन, विक्री करणाऱ्या हैदराबाद येथील फ्रूट एक्सने विदर्भाचा कॅलिफोर्निया असलेल्या वरूड परिसरात पहिल्यांदाच संत्र्याच्या लिलावासाठी सामंजस्य करार केला आहे. कंपनीने बाजार समितीच्या संत्रा लिलाव मंडईमध्ये ग्रेडिंग युनिट उभारले. यामध्ये ७५ पैसे प्रतिकिलो दराने संत्रा ग्रेडिंग, भराई आणि ग्रेडिंगनुसार लिलाव करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. प्रतवारीनुसार संत्रा विक्री करून वेळीच शेतकऱ्यांना पैसे दिल्या जाते.

मिळतो योग्य दरडिजिटल संत्रा लिलाव मंडईमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या संत्र्याचे ग्रेडेशन होऊन ते क्रेटमध्ये पडतात आणि त्यानंतर विकले जातात. सर्वोच्च गुणवत्तेच्या फळांसाठी लिलावात ४५ ते ४० रुपये किलो दर मिळतो, तर निम्नस्तर संत्रीसुद्धा २० रुपये किलोने जातात. 

आता शेतकरीच घेऊन येतात संत्री पूर्वी संत्राबागेतील फळे उतरविण्यासाठी व्यापाऱ्यांची प्रतीक्षा शेतकऱ्यांना असायची. आता थोडा त्रास होत असला तरी योग्य दर मिळत असल्याने शेतकरी संत्री मंडईत आणत असल्याचे चित्र आहे. देशात पहिला डिजिटल संत्रा बाजार संत्रा उत्पादकांना फायदेशीर ठरला आहे. पारदर्शक लिलाव पद्धत, ग्रेडेशन करून विक्री केली जाते. त्याचा जिल्हाभरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा.- नरेंद्र पावडे, बाजार समिती सभापती, वरूड

टॅग्स :Amravatiअमरावती