शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बिबट्यांची वाढती संख्या, वन विभाग अनभिज्ञ

By admin | Updated: November 8, 2014 22:29 IST

मेळघाट वगळता अन्य १२ तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढली असताना याबाबत वनविभाग मात्र अनभिज्ञ आहे. वनपरिक्षेत्रनिहाय बिबट्यांची संख्या किती? याची आकडेवारी निश्चित नसल्याने बिबट

सीमेवरील वस्त्यांना धोका : शिकारीच्या शोधात शहराकडे वाटचालगणेश वासनिक - अमरावतीमेळघाट वगळता अन्य १२ तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढली असताना याबाबत वनविभाग मात्र अनभिज्ञ आहे. वनपरिक्षेत्रनिहाय बिबट्यांची संख्या किती? याची आकडेवारी निश्चित नसल्याने बिबट हे शिकारीच्या शोधात शहरांकडे वाटचाल करीत आहेत. परिणामी सीमेवरील वस्त्यांना धोका निर्माण झाला असून गत आठवड्यात येथील अर्जुननगर भागात बिबट आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.जिल्ह्यात १४ तालुक्यांपैकी मेळघाटातील धारणी, चिखलदरा या दोन तालुक्यात वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. मात्र, उर्वरित १२ तालुक्यांतदेखील काही जातींचे वन्यप्राणी आढळतात. यात बिबट्यांचा समावेश असून त्यांच्या संख्येबाबत वनविभागात अधिकृत नोंद नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. काही महिन्यांपूर्वी येथील विद्यापीठ परिसरातही बिबट्याने धुमाकूळ घातला होता. मात्र, त्यावेळी बिबट्याला जेरबंद करता आले नाही, हे विशेष. अमरावती शहराच्या पूर्वेकडे वडाळी वनपरिक्षेत्र सुरु होत असून या परिक्षेत्रात मोठ्या संख्येने बिबट असल्याची माहिती आहे. वडाळी वनपरिक्षेत्रातील जंगलात बिबट्यांची संख्या किती? याबाबत निश्चित आकडेवारी सांगितली जात नाही. परंतु वडाळी वनपरिक्षेत्रात १० ते १२ बिबट असल्याची विश्वसनीय माहिती आहे. हरणांचे अधिक वास्तव्य असलेल्या वनपरिक्षेत्रात सर्वाधिक बिबट असल्याची माहिती आहे. अमरावती वनविभागांतर्गत पाच वनपरिक्षेत्रांत १२ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे हे दोन तालुके तर वरुडमध्ये वरुड तालुक्याचा समावेश आहे. तसेच वडाळी वनपरिक्षेत्रात अमरावती, भातकुली व नांदगाव खंडेश्वर तालुके, परतवाड्यात चांदूरबाजार, अचलपूर व दर्यापूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे. मोर्शी वनपरिक्षेत्रात तिवसा, मोर्शी तालुक्यांचा समावेश आहे. या पाचही वनपरिक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे. बिबट हा अंत्यत हुशार, चपळ वन्यप्राणी असल्याने तो लहानशा जागेतही दडून राहतो. त्यामुळे तो वस्तीत असल्याचे लक्षात येत नाही.