अमरावती : वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, अमानुष हत्या प्रकरण आदींमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे आ. सुनील देशमुख यांनी राज्य विधिमंडळ अधिवेशनात गुरुवारी लक्षवेधी सूचना मांडून मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.आ. सुनील देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये दिलेली लक्षवेधी सूचना सभापतींनी मान्य केली. शहरातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची बाब उपस्थित करण्यात आली. सेवानिवृत्त कारागृह अधीक्षक मित्रा आणि शरीरसौष्टव पटू नावेद इकबाल यांची हत्या करण्यात आली. तसेच शहरात काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांकडे देशी कट्टे आढळून आले. शहराच्या कानाकोपºयात अवैध धंदे फोफावले असून नियमबाह्य दारु विक्रीत वाढ झाली आहे. अवैध वाळू वाहतूक, शहरात गुटखा विक्री, गुंडाचा हैदोस आदी प्रकरणांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे आ. सुनील देशमुख म्हणाले. विलासनगरात दिवसाढवळ्या माथेफिरुंकडून धुडगूस घातला जातो. मग पोलीस यंत्रणा काय करते, असा सवाल आ. देशमुखांनी उपस्थित केला. गुन्हेगारी वाढली असताना पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात नाही, हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री रणणित पाटील यांनी लक्षवेधी सूचनेवर निवेदन करताना शहरातील कायदा, सुव्यवस्थेला बाधा पोहचणार नाही, त्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले जातील, अशी ग्वाही दिली. मात्र, पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांचे जीवन असुरक्षित असल्याचे आ. सुनील देशमुख म्हणाले.पोलीस प्रशासनावर ठपकाकायदा व सुव्यवस्थेला पोलीस जबाबदार असल्याचा ठपका आ. सुनील देशमुख यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे मांडला. अवैध धंदे वाढीस लागल्याने गुंडगर्दी फोफावली आहे. वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात पोलीस अपयशी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चोरी, घरफोडी, खून आदींमुळे संघटीत गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाब आ. देशमुखांनी सभागृहात मांडली. अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने चालतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शहरातील वाढती गुन्हेगारी विधिमंडळात गाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:32 IST
वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, अमानुष हत्या प्रकरण आदींमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे ......
शहरातील वाढती गुन्हेगारी विधिमंडळात गाजली
ठळक मुद्देसुनील देशमुखांची लक्षवेधी : मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले