शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

श्वसनाच्या आजारात वाढ

By admin | Updated: July 21, 2015 00:18 IST

शहरात वाढत्या वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने श्वसन विकाराच्या रुग्णांची माहिती इर्विन प्रशासनाला मागविली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्र : इर्विन प्रशासनाला मागितली रुग्णांची माहिती अमरावती : शहरात वाढत्या वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने श्वसन विकाराच्या रुग्णांची माहिती इर्विन प्रशासनाला मागविली आहे. शहरात ५० हजारांपेक्षा अधिक वाहनांची दररोज वर्दळ सुरु असते. त्यातच कालबाह्य झालेली वाहने सर्रासपणे शहरात फिरत आहेत. त्यामुळे वाहनांच्या धुरामुळे हवेत वायू प्रदूषण वाढल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांंमध्ये भीती निर्माण झाली आहे. राज्यातील मुंबई आणि नागपूरसह १८ शहरांमध्ये वायू प्रदूषण वाढल्याचे एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या सर्व्हेक्षणात शासनाला आढळून आले. त्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यभरातील शासकीय रुग्णालयाला श्वसन विकार जडलेल्या रुग्णांची माहिती मागविली आहे. अमरावतीमध्येही काही प्रमाणात वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्याकरिता इर्विन प्रशासनाला रुग्णांची माहिती मागविण्यात आली आहे. रुग्णांची माहिती गोळा करण्याचे कार्य इर्विन प्रशासनाने सुरु केले आहे. वायू प्रदूषण राज्यातील १८ शहरांमध्ये प्रदूषणाने उंच्चाक गाठला आहे. त्याअनुषंगाने अमरावतीमधील रुग्णांची स्थिती जाणून घेण्यासाठी इर्विन रुग्णालयाला पत्र पाठवून रुग्णांची माहिती मागविण्यात आली आहे. - अ. ज. कुडे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.अमरावतीत ७५ टक्के वायू प्रदूषण अमरावती जिल्ह्यात ७५ टक्क्यांच्या आसपास वायू प्रदूषण असून पेयजल प्रदूषणाचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. ध्वनी प्रदूषण ५० टक्क्यांच्या आसपास आहे. जलप्रदूषण ६२.५० टक्के इतके असल्याची नोंद ‘नंबिओ’ या संस्थेच्या सर्वेक्षणात केली आहे.