पुरुषांच्या तुलनेत महिला सदस्यांचा वाढला टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:12 AM2021-01-22T04:12:55+5:302021-01-22T04:12:55+5:30

अमरावती : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ असे समाजात महटले जाते व तेवढ्याच विश्वासाने यावेळी मतदारराजाने महिला ...

Increased percentage of female members compared to male | पुरुषांच्या तुलनेत महिला सदस्यांचा वाढला टक्का

पुरुषांच्या तुलनेत महिला सदस्यांचा वाढला टक्का

Next

अमरावती : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ असे समाजात महटले जाते व तेवढ्याच विश्वासाने यावेळी मतदारराजाने महिला उमेदवारांना भरभरून मतदान करीत गावाच्या विकासाची दोरी सोपविली आहे. जिल्ह्यात झालेल्या ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत एकूण ४,८७६ पैकी २,६९२ सदस्यपदांवर महिलांचा दिमाखदार विजय झालेला आहे. निवडणूक रिंगणातील पुरुष उमेदवारांच्या तुलनेत महिलांच्या विजयाचा टक्का ५६ असा राहिला आहे.

जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यात १६ ग्रामपंचायती अविरोध झाल्यामुळे एकूण ५३७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला घमासान झाले. एकच उमेदवारी अर्ज आल्यामुळे ४३४ सदस्य अविरोध निवडून आलीत. यामध्येही महिलांचा टक्का आहे तर प्रत्यक्ष निवडणुकीतही अशीच टक्केवारी कायम राहिली आहे. या निवडणुकीत ४,९०३ ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी एकूण १०,७५३ उमेदवार रिंगणात होते. यात ५३८३ पुरुष, तर ५३७० महिला उमेदवारांची संख्या राहिली म्हणजेच या निवडणुकीत पुरुषांच्या बरोबरीने महिला उमेदवार रणांगणात होत्या व अखेर बाजीदेखील महिलांनीच मारली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातदेखील महिला उमेदवारांचे यश कौतुकास्पद राहिले.

बॉक्स

मतदानात महिलांची ४७ टक्केवारी

ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण १० लाख २९ हजार २१३ मतदार होते. त्यातुलनेत १५ जानेवारीला ७ लाख ७२ हजार ४१८ मतदारांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावला. यात ३ लाख ६१ हजार ७७१ महिला व ४ लाख १० हजार ६४६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. यात महिला मतदारांची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत ४७ टक्के राहिली असला तरी विजयात मात्र, महिलांनी ५७ टक्के जागा मिळवित बाजी मारली आहे.

बॉक्स

सर्वसाधारण प्रवर्गात १,१७१ महिला सदस्य

या निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गात २०१० सदस्यांपैकी ११७१ पदांवर महिला उमेदवारांनी बाजी मारली. यामध्ये अमरावती तालुक्यात १०१, भातकुली ९०, नांदगाव खंडेश्वर १०६, दर्यापूर् १०८, अंजनगाव सुर्जी ७७, तिवसा ९४, चांदूर रेल्वे ७७, धामणगाव रेल्वे १४७, अचलपूर ८५, चांदूर बाजार १०७, मोर्शी ९८, वरूड ७७, धारणी २१ व चिखलदरा तालुक्यात ५ महिला उमेदवार आहेत.

बॉक्स

प्रवर्गनिहाय विजयी उमेदवार

एकूण ४८७६ सदस्यपदांत २,६९२ महिला उमेदवार विजयी झालेत. यात अनुसूचित जाती प्रवर्गात १,०४६ पैकी ५५९ महिला, अनुसूचित जमाती प्रवर्गात ७७२ पैकी ३५० महिला, नागरिकांच्या मागास प्रवर्गात १,१५७ पैकी ६१२ सदस्यपदे महिलांना, तर सर्वसाधारण प्रवर्गात २०१० पैकी ११७१ पैकी ११७१ सदस्यपदांवर महिला विजयी झाल्या आहेत.

Web Title: Increased percentage of female members compared to male

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.