जितेंद्र दखने अमरावतीस्थानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील १४९ विहिरींचे निरीक्षण केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील भूजल पातळी ० ते १ मीटरने वाढली आहे तर ५ तालुक्यांतील भूजलस्तर काही प्रमाणात घटला आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात एकूण १४९ विहिरींचे १४ तालुक्यांत मार्च २०१५ मध्ये निरीक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ८ तालुक्यातील भूजलस्तर सरासरीच्या प्रमाणात वाढला आहे. पाच तालुक्यांतील भूजलस्तरात काही प्रमाणात घट झाली आहे. चार वेळा होते सर्वेक्षणभूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत वर्षभरात चार वेळा सर्वेक्षण केले जाते. मोसमी पूर्व निरीक्षण मे महिन्यात. त्यानंतर आॅक्टोबरमध्ये खरीप हंगामाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये आणि रबी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच मार्चअखेरीस भूजल पातळी नोंदविण्यात येते. यावरुन जिल्ह्यामध्ये पिण्याचे दुर्भीक्ष जाणवणार काय याचा अंदाज घेतला जातो. शासनाने नव्याने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा भूजल पातळीच्या वाढीसाठी उपयोगी अभियान आहे. धरण, तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, विंधन विहीर, जलव्यवस्थापन यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. - सुनील कडू, वरिष्ठ भूवैज्ञानिक, अमरावती.
आठ तालुक्यांत वाढली भूजल पातळी
By admin | Updated: April 12, 2015 00:12 IST