शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

कोरोना संसर्ग वाढीला; बॅन्ड, बाजा, बारात जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:17 IST

फोटो पी १६ मोर्शी पान २ चे लिड मोर्शी : आठवडाभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या धडकी भरविणारी असली तरी सर्वसामान्यांवर त्या ...

फोटो पी १६ मोर्शी

पान २ चे लिड

मोर्शी : आठवडाभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या धडकी भरविणारी असली तरी सर्वसामान्यांवर त्या संख्येचा, वाढत्या संसर्गाचा यत्किंचितही परिणाम झालेला नाही. अलीकडच्या काळात धूमधडक्यात झालेले लग्न सोहळे व त्यातील मोठ्या गर्दीमुळे कोरोनाचा ब्लास्ट झाल्याचे चित्र असताना, नागरिकांसह तालुका प्रशासनाला कोरोनाचे सोयरसुतक राहिलेले नाही. अमरावती शहरातील बोटावर मोजण्याइतपत कारवायांचा अपवाद वगळता, जिल्ह्यात कुठेही कारवाई करण्यात आलेली नाही. कोरोनाचा संसर्ग नव्याने उड्डाणे घेत असताना, बॅन्ड, बाजा, बारात जोरात सुरू आहे. प्रशासनदेखील निद्रिस्त आहे.

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सभा, रॅली या बाबीला मनाई करण्यात आली आहे. लग्न समारंभात फक्त ५० व्यक्तींना परवानगी दिली आहे. परंतु, मोर्शी शहरात शेकडो वरातीसह नवरदेवाची वरात वाजत-गाजत काढल्या जात असल्यावरसुद्धा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसून येते. त्याचबरोबर लग्न समारंभाच्या नियोजित स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही, याची जबाबदारी घेण्यात यावी तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याचे आढळून आल्यास, याबाबत पोलीस विभागाने त्यांच्या स्तरावरून नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या, असा आदेश पारित केला आहे. तरीही मोर्शी शहरात सोमवारी रात्री तीन ते चार नवरदेवांची वाजतगाजत डीजे, बँडसोबत वरात काढली गेली. विशेष म्हणजे, या वेळी शेकडो नागरिक तेथे उपस्थित होते. महिला व पुरुष नाचत असल्याने बघ्यांची मोठी गर्दी होती.

आदेशाला खो

जिल्ह्यात कलम १४४ लागू असताना शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत वाजत असलेल्या डीजेचा आवाज पोलिसांच्या कानावर गेला नाही का, असा संतप्त सवाल काही नागरिक विचारत आहेत. नवरदेवाच्या वरातीत ३०० ते ४०० लोक एकत्र येत आहेत. लग्नात केवळ कागदोपत्री ५० जणांची परवानगी घेतली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात लग्नात ३०० पेक्षा अधिक जण सहभागी होत आहेत. ही बाब कुणीही नाकारत नाही.

--------------------

फोटो पी १६ वरूड

लग्न प्रसंगात ५०! छे, ३०० पेक्षा कमी कमी मुळीच नाही

जमावबंदीला हरताळ : जिल्हाधिका०यांचा आदेश कागदोपत्री, समारंभात व०हाडी बिनधास्त

वरूड : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा कहर, तर दुसरीकडे धूमधडाक्यात विवाह समारंभाची लयलूट सुरू आहे . जिल्हाधिकाºयांनी पाचपेक्षा अधिक लोक एका ठिकाणी जमण्यावर जमावबंदीचे आदेश जारी केले. मात्र, एका एका लग्न सोहळ्यात ३०० ते ४०० लोक उपस्थित असताना तालुकास्तरावर कुठलीही कारवाई नाही. अपवाद वगळता, एकाही वºहाड्याच्या चेहºयावर मास्क आढळून येत नाही. नवरदेवाच्या वरातीत २०० ते ३०० लोक सहभागी होत असून, बिनधास्त वावर सुरू आहे. बॅन्डबाजा ताकदीने वाजविला जात आहे.

तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी नागरिकांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा फज्जा उडाला आहे. यामुळे नागरिकांनो सावधान, कोरोना अजूनही संपलेला नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. तीन चार महिन्यांपूर्वी तालुकास्तरावर मास्क व वापरणाºयांविरुद्ध कारवाईचा दंडुका उगारण्यात आला. मात्र, आता एका दिवशी ४५० च्या आसपास रुग्ण निघत असताना, प्रशासनाची कारवाई शून्य आहे.

आता सर्रास नागरिक विनामास्क फिरताना दिसतात, तर वाहनातून प्रवास करताना क्षमतेपेक्षा अधिक आणि विनामास्क बसून प्रवास सुरू झाला. बाजारात आणि वर्दळीच्या ठिकाणी हीच अवस्था आहे. ना मास्क, ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टन्स अशी अवस्था असून आठवडाभरात तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढले आहेत. यातच विवाह सोहळे, कार्यक्रमावर बंदी असताना शेकडो लोकांच्या उपस्थित सोहळे पार पडत आहे. यातून कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. कुठेही कोरोनाची भीती उरलेली नसून, बिनधास्तपणे नागरिकांचा वावर आणि समारंभ पार पडत आहेत.

-------------