भातकुली : सततचा रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे संपूर्ण तालुक्यात व्हायरल फिव्हरच्या रुग्णासंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तापासह थंडी, सर्दी, खोकला, मळमळ, अंगदुखी आणि डोकेदुखी ही लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. यामध्ये मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागात दवाखान्यामध्ये गर्दी दिसून येत आहे.
पावसाळ्यातील सततच्या बदलत्या वातावरणामुळे संसर्सजन्य आजारात वाढ झाली आहे. कधी पाऊस, कधी ऊन, कधी दमट वातावरण तर कधी थंडीचे वातावरण निर्माण होत असल्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. लहान मुलांची प्रतिकार क्षमता कमी असल्याने त्यांना संसर्गजन्य आजाराचा धोका अधिक असतो. याशिवाय वातावरणाच्या या परिणामामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या श्वसन क्रियेवर परिणाम होऊन आजार उद्भवतातद्या आजारांवर काही जण घरीच मेडिकल स्टोअरमधून औषध-गोळ्या आणून घेत आहेत. सर्दी, ताप खोकला यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकताच नाही, असे त्यांचे उत्तर ठरलेले आहे. मात्र, कोणतेही औषध घेण्यापूर्वी किमान लक्षणे आणि औषध याची डाॅक्टरांना माहिती देत त्यांच्या सल्यानुसार औषधे घ्यावी, असे भातकुली येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ................................................. यांनी केली आहे.