शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन कुलगुरूंच्या कार्यकाळात ६० लाखांचा आयकर घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 19:56 IST

मोहन खेडकर हे विद्यापीठात २३ फेब्रुवारी २०११ ते २४ फेब्रुवारी २०१६ दरम्यान कुलगुरू होते.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी आयकर विवरणपत्रात बंगल्यावरील कर्मचारी आणि सोयीसुविधांची माहिती दडवून ठेवल्याने ६० लाखांचा आयकर घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. येथील आयकर विभागाने ५ जानेवारी रोजी खेडकर यांच्यासह विद्यापीठाला नोटीस बजावली. 

मोहन खेडकर हे विद्यापीठात २३ फेब्रुवारी २०११ ते २४ फेब्रुवारी २०१६ दरम्यान कुलगुरू होते. आयकर विभागाने सुसज्ज कुलगुरू बंगल्यावर खेडकरांनी घेतलेल्या वीज, पाणी, फर्निचर, नोकर-चाकर आदी सुविधांवरील खर्चावर बोट ठेवले आहे. वीज, फर्निचर, बागवान, बंगल्यावर कामगार, घरकामगार, सुरक्षा रक्षक, कायमस्वरूपी कर्मचारी आणि वॉचमन यांच्यासाठी पाच वर्षांत १ कोटी ३९ लाख रुपये खर्च झाल्याची आकडेवारी आहे. या खर्चाच्या अनुषंगाने खेडकरांच्या मासिक वेतनात ही रक्कम नमूद होणे नियमावलीनुसार आवश्यक होते. मात्र, खेडकरांनी पाच वर्षांत सुसज्ज कुलगुरू बंगल्यावर सर्वच सुविधा घेतल्या आहेत. 

तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी पदाचा दुरूपयोग करून ही माहिती आयकर विभागाला कळविली नाही. आयकर विभागाकडे फॉर्म क्रमांक १६ व १२ बी.ए.मध्ये कर्मचारी वेतन, बंगल्यावर फर्निचरसह अन्य सुविधांवर झालेला खर्च नमूद केला नाही. खेडकरांनी आयकर विवरणपत्रात बंगल्यावरील कर्मचाºयांचे वेतन, सुविधांवरील खर्च सादर केला नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने माहिती अधिकारातून स्पष्ट केले होते. खेडकर यांच्या पाच वर्षांच्या काळात कर्मचारी वेतन, माळी, सफाई कर्मचारी, पाणी, विद्युत, फर्निचर सुविधा, कंत्राटी कर्मचारी आदींचा खर्च १ कोटी ३९ लाख रुपये झाला आहे. त्यामुळे आयकर विभागाने कर चोरीप्रकरणी तत्कालीन कुलगुरू खेडकर यांच्यावर ६० लाखांच्या आयकर चोरीचा ठपका ठेवला आहे. आता खेडकर यांच्याकडून मूळ आयकर चोरीचे ४२ लाख आणि १९ लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यानुसार मोहन खेडकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

कर्मचाऱ्यांवर खर्च झालेल्या वेतनाची रक्कम तत्कालीन कुलगुरू खेडकर यांना पाच वर्षांत १ कोटी ३९ लाखांच्या वेतनावर ६० लाखांचे दंड आकारले आहे. यात नियमित कर्मचारी वेतन ७८ लाख ३७ हजार, दैनंदिन कामगार २ लाख ४४ हजार, माळी आणि कंत्राटी कर्मचारी २२ लाख २७ हजार, वीज देयके ५ लाख, फर्निचर साहित्य खरेदी ५ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती आहे.         आयकर विभागाकडून प्राप्त नोटीसबाबत कल्पना नाही. मात्र, तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांच्या खर्चाच्या अनुषंगाने आलेल्या नोटीससंदर्भात दखल घेतली जाईल.- भारत कऱ्हाड वित्त व लेखाधिकारी, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Amravatiअमरावती