शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

नगरपालिका निवडणुकीवर इन्कम टॅक्स विभागाचे लक्ष

By admin | Updated: October 27, 2016 00:07 IST

जिल्ह्यात ९ नगरपालिकांची निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी होणार असून उमेदवारांच्या वारेमाप खर्चावर आता आयकर विभागाची नजर राहणार आहे.

वारेमाप खर्चावर अंकुश : उमेदवारांच्या हालचालींवरही नजरअमरावती : जिल्ह्यात ९ नगरपालिकांची निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी होणार असून उमेदवारांच्या वारेमाप खर्चावर आता आयकर विभागाची नजर राहणार आहे. त्याकरिता आयकर विभागाने स्वतंत्र चमू तयार केली आहे. विशेषत: श्रीमंत उमेदवारांकडून होणाऱ्या पैशांच्या उलाढालींवर ‘ब्रेक’ लावण्याची तयारी करण्यात आली आहे.नगरपालिका निवडणुकीचा बिगूल वाजताच जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली. त्याअनुषंगाने पदाधिकाऱ्यांची वाहने, शासकीय सुविधांना कात्री लावण्यात आली आहे. विशेषत: प्रशासनाने आचारसंहितेतील ९ तरतुदींचे काटेकोपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी यापूर्वीच दिल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, महापालिका आयुक्त हेमंत पवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र मालमत्ता विरूपण करणे प्रतिबंध कायदा १९५५ नुसार या कायद्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स प्रसिद्ध करु नयेत, राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी पूर्वपरवानगी शिवाय बैठकांचे आयोजन करू नये, अशा सूचना प्रशासनाकडून राजकीय पक्षप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. नगरपालिकांची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभन, आमिष देताना होणाऱ्या पैशांच्या व्यवहारावर आता आयकर विभागाची चमू लक्ष ठेऊन राहणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गित्ते यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांच्या अनधिकृत व्यवहारावर चाप बसविण्यासाठी आता आयकर विभागाच्या चमुला मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयकर विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे. निवडणुकीत गैरमार्गाने पैशांचा व्यवहार होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मार्गदर्शक सूचना कळविण्यात आल्या आहेत. यावेळी निवडणुकीत आयकर विभागाला विशेष कामगिरी पार पाडावी लागेल.- किरण गित्ते, जिल्हाधिकारी, अमरावती.