कापूस उत्पादकांची व्यथा : कापसाला हवा किमान सात हजार रूपये प्रतिक्ंिवटलचा दरजितेंद्र दखने अमरावतीदिवाळीच्या तोंडावर ग्रामिण भागात कापुस वेचाईला वेग आला आहे. किलोभर कापुस वेचण्यासाठी मजूराला पाच रूपये दर द्यावा लागत आहे.एक क्विंटल कापुस वेचण्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशातून तब्बल पाचशे रूपये जात असल्याने उत्पन्न आणि उत्पादनाचा मेळ बसविणे कठीण झाले आहे.दिवाळी साजरी करण्यासह मुलींचे माहेरपण जपण्यासाठी शेतकऱ्यांना घरातील कापुस बेभाव विकण्याशिवाय पर्याय नाही. खासगी व्यापाऱ्यांना अल्प दराने कापूस विकून दिवाळी साजरी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.सध्या बाजारात कापसाला प्रतिक्विटल ४५०० ते ४६०० रूपये दर मिळत आहे.त्यातच पाच रूपये किलोप्रमाणे वेचणी आणि तत्पूर्वी झालेला खत, फवारणी आणि लागवडीसाठी लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. चार वर्षाच्या सततच्या दुष्काळानंतर यंदा पावसाने संततधार लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.खरीपाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून पिकांची लागवड केली.सोयाबीनने घात केला असला तरी शेतकऱ्यांच्या आशा पांढऱ्या सोन्याकडे लागल्या आहेत. यंदा अस्मानी संकटाने काहीसे तारले असले तरी सुल्तानी कारभाराने शेतकऱ्यांत नाराजी आहे. मात्र दराचा विचार करता कपाशीचे पीक मारक ठरले आहे. लागवडीचा खर्च अधिक असल्याने कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार रूपये दर देण्याची मागणी शेतकऱ्यामधून व्यक्त होऊ लागली आहे.असा आहे कपाशीचा एकरी खर्चनांगरणी, वखरणी, बियाणे, लागवडीसाठी प्रत्येकी १ हजार , चार हजार रूपयांचे खत, निंदणाला प्रती एकर तीन हजार रूपये, वेचणी प्रतिकिलो पाच रूपये, फवारणी सहा हजार रूपये असा जवळपास १८ हजारावर खर्च करावा लागतो. कापसाचे उत्पादन सरासरी तिन ते पाच क्विंटल होते . सध्या कापसाला प्रतिक्विंटल ४५०० ते ४६०० रूपये मिळत आहे. त्यामुळे कपाशीला किमान ७ हजार रूपये भाव मिळणे गरजेचे आहे.खासगी बाजारात व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडले आहेत. हे विशेष शेती मशागतीपासून लागवड, बियाणे, फवारणीचा खर्च जवळपास एकरी १८ हजारांवर पोहचतो कापुस वेचणीचाही दर प्रतिकिलो चार ते पाच रूपये आहे. त्यामुळे कापसाला सरासरी सात हजार रूपये प्रतिक्विंटल दर मिळणे आवश्यक आहे.- प्रवीण काडगाळे , शेतकरी, हिरापूर
उत्पन्न - उत्पादन खर्चाचा मेळ बसेना!
By admin | Updated: November 2, 2016 00:05 IST