शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यरत्न सुदामदादा सावरकर साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 18:19 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे संकलन आणि संपादन करून ते संपूर्ण साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहित्यरत्न सुदामदादा सावरकर यांनी केले.

तिवसा (अमरावती) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे संकलन आणि संपादन करून ते संपूर्ण साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहित्यरत्न सुदामदादा सावरकर यांनी केले. राष्ट्रसंतांच्या जीवनावर जीवनपयोगी नावाचे ११ खंड लिहून राष्ट्रसंतांचे खरे चरित्र जगापर्यंत नेणारे सुदामदादा हे सर्वोत्तम साहित्यिक होते, असे प्रतिपादन साहित्यिक सतीश तराळ यांनी केले. 

श्रीक्षेत्र वरखेड येथे आयोजित दोन दिवसीय साहित्यरत्न सुदामदादा सावरकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानाहून सतीश तराळ यांनी मार्गदर्शन केले. शनिवारी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात झाली. ह.भ.प. लक्ष्मणदास काळे महाराज यांनी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी विचारपीठावर अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे, साहित्यिक सुभाष सावरकर, विघे गुरुजी, जि.प. सदस्य अभिजित बोके, रामचंद्र कांडलकर, प्रल्हाद पारिसे, सरपंच मालू बोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटक ह.भ.प. लक्ष्मणदास काळे महाराज यांनी आपल्या रसाळ वाणीतून सुदामदादा आणि राष्ट्रसंतांच्या कार्याची महती विशद केली. याप्रसंगी जनार्दन बोथे, सुभाष सावरकर यांचीही भाषणे झाली. संचालन मंदा नांदूरकर व आभार प्रदर्शन रमेश बोके यांनी केले. कार्यक्रमाला श्रीगुरुदेवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.