शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गुलिस्तानगरमध्ये दोेघांना चाकूने भोसकले; तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 05:00 IST

आरोपी हे त्याच परिसरातील एका मशिदीजवळ असल्याचे त्यांना समजले. परिसरातील एका शौचालयाजवळ फिरोजखानला दोन्ही आरोपी दिसले. त्यावेळी त्यांना विचारणा केली असता, शाकीर खान हा फिरोजखान व शेख मुनज्जरच्या मागे चाकू घेऊन धावला. शेख मुनज्जरने चाकूचा वार चुकवत तेथून पळ काढला, तर फिरोजखान हा जीव वाचवत पळत असताना शाकीर खानने त्याच्यावर हल्ला केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेहुण्याशी वाद का घातला, याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या दोन जावयांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास गुलिस्तानगर स्थित मशिदीजवळ ही घटना घडली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध भादंविचे कलम  ३०२, ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फिरोजखान अफसरखान (३५, रा. गुलिस्तानगर) असे मृताचे नाव आहे, शेख मुनज्जर शेख बार असे जखमीचे नाव आहे. नागपुरी गेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोजखानचा मेहुणा शेख जबीर शेख खलील हा त्याच्या आईला घेऊन दवाखान्यात जात असताना काही अंतरावर एक ऑटोरिक्षा समोर आली. त्यामुळे शेख जबीर थांबला. त्याचवेळी आरोपी शाकीर खान जाकीर खान (२१) व सोहेल खान फिरोज खान (१९, दोघेही रा. गुलिस्तानगर) हे त्याच्या मागे होते. त्यावेळी दोन्ही आरोपींनी दुचाकी समोर काढण्याच्या कारणावरून शेख जबीरला शिवीगाळ केली. त्याच्याशी हुज्जतदेखील घातली. मात्र, वाद न घालता शेख जबीर हा तेथून आईला घेऊन दवाखान्यात गेला. काही वेळाने ही बाब शेख जबीरचा जावई फिरोजखानला समजली. आरोपी हे एकाच मोहल्ल्यातील असल्याने नेमके काय घडले व समजावण्यासाठी फिरोजखान हा साडू शेख मुनज्जरला घेऊन गुलिस्तानगरमध्ये पोहोचला. दरम्यान, आरोपी हे त्याच परिसरातील एका मशिदीजवळ असल्याचे त्यांना समजले. परिसरातील एका शौचालयाजवळ फिरोजखानला दोन्ही आरोपी दिसले. त्यावेळी त्यांना विचारणा केली असता, शाकीर खान हा फिरोजखान व शेख मुनज्जरच्या मागे चाकू घेऊन धावला. शेख मुनज्जरने चाकूचा वार चुकवत तेथून पळ काढला, तर फिरोजखान हा जीव वाचवत पळत असताना शाकीर खानने त्याच्यावर हल्ला केला. 

उपचारादरम्यान मृत्यूगंभीर जखमी स्थितीत फिरोजखान हा त्याच भागातील एका घराजवळ कोसळला. तितक्यात सोबत असलेला साडू तेथे पोहोचला. त्यांनी दुचाकीने फिरोजखान याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे काही वेळातच फिरोजखानचा मृत्यू झाला.

साल्याशी वाद का घातला, अशी विचारणा करण्यासाठी व समजावण्यासाठी गेलेल्या दोघांवर चाकूने हल्ला करण्यात आला. पैकी एकाचा मृत्यू झाला. दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तपास सुरू आहे. पैकी मुख्य आरोपी शाकीर खानला अटक करण्यात आली. पु्ंडलिक मेश्राम, ठाणेदार, नागपुरी गेट

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी