शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्हा परिषदेत 'एक दिवस तिच्यासाठी' उपक्रम, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा निराधार, दिव्यांग, विधवा महिलांना मदतीचा हात

By जितेंद्र दखने | Updated: November 6, 2023 18:12 IST

Amravati News: दिवाळीसारख्या आनंदाच्या सणापासून एखादी गरीब, निराश्रित महिला वंचित राहू नये, यासाठी खुद्द जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. कुठलाही शासनादेश नसतानासुद्धा केवळ सामाजिक बांधिलकी जोपासत अमरावती जिल्हा परिषदेकडून यंदा 'एक दिवस तिच्या’साठी हा उपक्रम राबविला जाणार आहे.

- जितेंद्र दखने अमरावती - दिवाळीसारख्या आनंदाच्या सणापासून एखादी गरीब, निराश्रित महिला वंचित राहू नये, यासाठी खुद्द जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. कुठलाही शासनादेश नसतानासुद्धा केवळ सामाजिक बांधिलकी जोपासत अमरावती जिल्हा परिषदेकडून यंदा 'एक दिवस तिच्या’साठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. विशेष म्हणजे विदर्भात अमरावती जिल्हा परिषद ही अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी बहुधा पहिलीची जिल्हा परिषद ठरणार आहे.

कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन व इतर हक्कांसाठी लढा देणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या संघटनेनेसुद्धा या उपक्रमासाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे. दिवाळी म्हणजे आनंदाच सण, मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या तसेच निराधारांना दिवाळीचा आनंद लुटता येत नाही, त्यांनासुद्धा या सणाचा आनंद मिळावा, यासाठी ‘एक दिवस तिच्या’साठी हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत गावातील गरीब, निराधार महिलेची निवड करून अंगणवाडी सेविकांमार्फत तिला साडी - चोळीचा अहेर, दिवाळीचा फराळ, तिच्या मुलांसाठी फटाके, दिवे आदी साहित्याचे किट दिले जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जाणार आहे. सीईओंच्या या अनोख्या उपक्रमासाठी हातभार लागावा म्हणून जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऐच्छिक रक्कम जमा केली असून, त्या रकमेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निराधार, अपंग, विधवा महिलेला दिवाळीची भेट दिली जाणार आहे.

हा उपक्रम सामाजिक भावनेतून राबविण्यात येणार असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ऐच्छिक सहकार्य घेतले जाणार आहे. समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

टॅग्स :Amravatiअमरावती