शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अमरावती जिल्ह्यात वर्षात १०१९ बालकांचा मृत्यू, ३५ माता दगावल्या

By उज्वल भालेकर | Updated: June 8, 2024 21:35 IST

वर्षभरात ३२ हजार ३९४ बालकांचा झाला जन्म, ४८१ उपजत मृत्यू 

अमरावती : जिल्ह्यातील बालमृत्यू आणि कुपोषण अजूनही तितकेच गंभीर असल्याचे आरोग्य विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात १०१९ बालकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ४८१ मृत्यू हे उपजत असून, आरोग्य विभागाकडून उपजत मृत्यू रोखण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वर्षभरात ३२ हजार ३९४ बालकांचा जन्म झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. विविध सामाजिक संस्थांनाही कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पुरविला जातो. तरीही जिल्ह्यातील बालमृत्यूचे चक्र थांबलेले नाही. जिल्ह्यात रोज सरासरी दोन बालकांचा मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आजही मेळघाटातील नागरिकांना आरोग्याच्या अपुऱ्या सोयी-सुविधा असल्याने अनेक गंभीर बालकांना अमरावती येथे जिल्हा स्त्री रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे.

मेळघाटातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे प्रत्येक वेळी आश्वासन मिळते. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना राबविण्यात येत नसल्याचे सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक बालमृत्यू, उपजत मृत्यू तसेच मातामृत्यूचे प्रमाण हे मेळघाटातील आदिवासी क्षेत्रातील आहे.

३५ माताही दगावल्याआरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात वर्षभरात ३५ मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये मेळघाटातील मातांची संख्या अधिक आहे. वेळीच उपचाराच्या सुविधा न मिळणे तसेच प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्राव होणे, शरीरात हिमोग्लोबीन कमतरता, गर्भधारण काळात योग्य आहार न मिळणे अशी अनेक कारणे माता मृत्यूला जबाबदार आहेत.

वर्षभरात ३२१६४ महिलांची प्रसूतीजिल्ह्यात २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये १७ हजार ७६४ नैसर्गिक, तर १४ हजार ४०० प्रसूती ही सिझेरियन असे एकूण ३२ हजार १६४ महिलांची प्रसूती झाली. यामध्ये ३२ हजार ३९४ बालकांचा जन्म झाला असून, १६ हजार ८२६ मुले, तर १५ हजार ५६८ मुलींचा जन्म झाला आहे.

ठोस उपाययोजनांची आवश्यकतामेळघाटातील बालमृत्यू व माता मृत्यू रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. शासनाने येथील अतिदुर्गम भागातील गावांमध्ये आरोग्याच्या सोयी-सुविधा पोहोेचविण्यासाठी विशेष भर देण्याची गरज आहे. येथील काही दुर्गम भागात आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत असल्याचेच चित्र पाहायला मिळते. तसेच येथील आदिवासींमध्ये प्रसूतीसाठी रुग्णालयात येण्यासाठी समुपदेशन आवश्यक असून, मेळघाटात आरोग्य सुविधा वाढवून येथील रेफरचे प्रमाणही थांबविणे गरजेचे आहे.

वर्षभरातील बाल मृत्यू व माता मृत्यूची आकडेवारीउजपत मृत्यू : ४८१० ते १ वर्ष अर्भक मृत्यू : ४७६१ ते ५ वर्षे बालमृत्यू : ६२मातामृत्यू : ३५एकूण मृत्यू : १ हजार ५४