शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘एनए’ वापरात सुधारणा, विकासकांना मोकळे रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:26 IST

जमिनीच्या अकृषक (एनए) वापरासाठी आवश्यक असलेल्या परवानगीमध्ये सुधारणा करण्यासाठी आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमात चार बदल करण्यात आले व अकृषक आकारणी सुलभ करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअकृषक आकारणी सुलभ जमीन महसूल अधिनियमात चार सुधारित बदल

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जमिनीच्या अकृषक (एनए) वापरासाठी आवश्यक असलेल्या परवानगीमध्ये सुधारणा करण्यासाठी आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमात चार बदल करण्यात आले व अकृषक आकारणी सुलभ करण्यात आली आहे. विकास आराखडा व प्रादेशिक योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या जमिनीच्या विकासासाठी आता अकृषक परवानगी घेण्याची गरज नसल्याने विकसकांना रान मोकळे झाले आहे.नगरविकास विभागाद्वारा मंजूर विकास योजनेत भोगवटदार वर्ग-१ असलेल्या जमिनीच्या वापरात बदल करण्यासाठी महत्त्वाची असणारी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची अट आता रद्द करण्यात आली. मात्र जमिनीचा वर्ग, तिचा भोगवटा आणि त्यावरील भार याबाबतची निश्चिती महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतीच्या प्राधिकाऱ्यांना महसूल विभागाकडूनच करावी लागणार आहे. भोगवटदार वर्ग-२ जमिनीचा वापर बदलासाठी मात्र जिल्हाधिकाऱ्यांची ‘नाहरकत’ आवश्यक आहे. महसूलच्या पडताळणीनंतर देय नजराणा व शासकीय देणे यांचा भरणा करावा लागेल. त्यानंतरच भोगवटदाराला कलम ४२-अ नुसार विकासाची परवानगी देण्यात येणार आहे. कलम ४२-ब नुसार अंतिम विकास योजना क्षेत्रात समाविष्ट जमिनीच्या वापरासाठी रूपांतरणाची तरतूद करण्यात आलेली आहे.या दोन्ही कलमांतर्गत क्षेत्रातील अकृषक आकारणीबाबत अर्जदाराला महापालिका, नगरपालिकेकडे अर्ज करावा लागणार आहेत. बांधकाम परवानगी द्यावयाच्या जमिनीचा रूपांतरीत कर, अकृषक आकारणी व लागू असल्यास नजराणा किंवा अधिमूल्य व इतर शासकीय देणी यांचे निश्चितीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळवावे लागणार आहे. अकृषक रूपांतरित कर, अकृषकची आकारणी, आवश्यक असेल तेथे अधिमूल्य तसेच इतर शासकीय कराचा भरणा केल्यानंतरच बांधकामाची परवानगी देण्यात येणार आहे. विकसकाच्या ‘अर्थपूर्ण’ संबंधाने आता या परवानग्या मिळविणे सहज सोपे झाले आहे.घर बांधणीसाठी जमीन रूपांतराची तरतूद* महापालिका, नगरपालिकांच्या हद्दीपासून २०० मीटर क्षेत्रातील कोणतीही जमीन विकास नियमनांच्या तरतुदीच्या अधीन राहून निवासी बांधकामासाठी अकृषक वापरास रूपांतरित झाल्याचे समजण्यात येणार आहे.* जमीन भोगवटदार-२ वर्गातील असल्यास रूपांतरणासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कर, अकृषक आकारणीचा शासनभरणा करावा लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेती