शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी सुधारणेसाठी समिती, सातवा वेतन आयोग लागू करण्याची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 17:29 IST

केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यात १९ लाख कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे.

- गणेश वासनिक अमरावती : केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यात १९ लाख कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. तत्पूर्वी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा केली जाणार असून, त्याकरिता सेवानिवृत्त अवर सचिव के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.दर १० वर्षांनी राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केले जाते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षभरापूर्वी वेतन आयोग लागू झाला. मात्र, राज्य कर्मचाºयांना तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सातवा वेतन आयोग लागू केला जात आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तशी घोषणादेखील केली आहे. चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातवा वेतन आयोग लागू करताना आर्थिक तरतूदसुद्धा केली जाणार आहे. मार्चमध्ये कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी या वर्षांच्या शेवटी अंमलबजावणी होईल, असे सूत्रांनी सांगितले.राज्य शासनाच्या अधिपत्याखाली ४९ विभाग कार्यरत असून, यापैकी २५ पेक्षा अधिक विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांचे पदानुसार वेतनश्रेणी लागू नाही. त्यामुळे राज्य कर्मचारी संघटनेच्या निवेदनाचे खच मंत्रालयात पडून आहेत. वेतन आयोग लागू करताना कर्मचाºयांना कोणत्या स्वरूपाची वेतनश्रेणी अपेक्षित आहे, त्यानुसार मत जाणून घेण्यासाठी सुधारित वेतनश्रेणीची शिफारस करण्यात आली आहे. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवानिवृत्त अवर सचिव के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती गठित करून कर्मचाºयांना वेतन आयोग लागू करण्यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल मागविला आहे. ही समिती विविध विभागातील कर्मचाºयांच्या वेतनाबाबत अभ्यास करणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार कोणत्या विभागातील कर्मचाºयांना वेतनश्रेणी लागू करावी, यासंदर्भात शासनाला शिफारस करणार आहे. पोलीस, वन विभाग, भूमिअभिलेख, सिंचन, शिक्षण, राज्य रस्ते परिवहन महामंडळातील कर्मचाºयांचे ग्रेड पे अत्यंत कमी असल्याने सातवा वेतन आयोगात ग्रेड पे वाढवण्यासाठी या विभागाचे कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे वास्तव आहे.

शिफारसीसाठी वित्त विभागाचे पत्र सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची ओरड होऊ नये, यासाठी वित्त विभागाने १ मार्च २०१८ रोजी पत्र जारी केले आहे. सर्व विभाग प्रमुखांना त्यांच्या अधिनस्थ आस्थापनेतील अधिकाऱ्यांना वेतनासंदर्भात सूचना व सुधारणेसाठी अहवाल वजा मत मागविले आहे. परंतु वित्त विभागाचे हे पत्र अद्यापही अनेक विभागात पोहचले नाही. त्यामुळे वेतनश्रेणी शिफारसीबाबत सध्यातरी विभागप्रमुख अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.

वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांचे होणार अपेक्षा भंगराज्य सेवेतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना ग्रेड पे मध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे हवे तसे त्यांच्या वेतनात वाढ झालेली नाही. सातव्या आयोगातील ग्रेड पे मध्ये विशेष फरक असणार नसून पुन्हा वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची अपेक्षा भंग होईल, असे संकेत आहे.