शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

झोन कार्यालयात अपहार

By admin | Updated: June 11, 2016 23:58 IST

महापालिकेतील झोन क्रमांक ५ या कार्यालयात २.४३ लाख रुपयांचा आर्थिक अपहार उघड आला आहे.

निलंबित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हे : अडीच लाखांची अफरातफर अमरावती : महापालिकेतील झोन क्रमांक ५ या कार्यालयात २.४३ लाख रुपयांचा आर्थिक अपहार उघड आला आहे. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी वसुली लिपिक पंकज डोणारकर याचेविरुद्ध कलम ३८१, ४०६, भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन पावती पुस्तके गहाळ केल्याचा ठपका ठेवून मनपा आयुक्तांनी डोनारकर याला ६ जून रोजी तत्काळ प्रभावाने निलंबित केले होते. तसेच फौजदारी तक्रारीचे संकेत दिले होते. भाजीबाजार येथे महापालिकेचे झोन कार्यालय असून पंकज डोणारकर हा या कार्यालयात वसुली लिपिक म्हणून कार्यरत असताना करवसूलीचे पावती पुस्तक गहाळ झाल्याचे प्रकरण उघड झाले होते.उपायुक्तांच्या अहवालावर निलंबितअमरावती : करवसुलीचे १२३७९ व १२३९६ ही दोन पुस्तके गहाळ झाली होती. तपासणीदरम्यान ही पावती पुस्तके अन्य सहकाऱ्यांच्या कपाटात ठेवताना आरोपी पंकज डोणारकर आढळून आला. त्याला याबाबत विचारणा केली असता तो निघून गेला. त्यानंतर उपायुक्तांच्या आश्वासानुसार त्याला निलंबित करण्यात आले व त्याची चौकशी प्रारंभ करण्यात आली होती. नवनियुक्त आयुक्त हेमंत पवार आणि उपायुक्त विनायक औघड यांनी आरोपीविरुद्ध फौजदारी तक्रार करण्याचे निर्देश दिले होते. (प्रतिनिधी)कबुलीनंतर फौजदारी आरोपी पंकज डोणारकरने पावती पुस्तक चोरीसह अपहाराची कबुली देऊन झोन कार्यालयात परत केला. मात्र या संपूर्ण प्रकरणात आर्थिक अनियमितता होऊन महापालिकेचे नुकसान झाल्याने त्यांचेविरुद्ध खोलापुरीगेट ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. याच कार्यालयात कार्यरत कनिष्ठ लिपिकाच्या तक्रारीवरून निलंबित कर्मचारी पंकज डोणारकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोणारकरने दिली कबुली चौकशीदरम्यान संबंधित पावती पुस्तके चोरल्याची कबुली पंकज डोणारकर याने दिली. पावती क्रमांक १२३९५०१ ते १२३९५३९ पर्यंत ३९ पावत्यांमधून २,४३ ५०७ रुपयांची वसुली केली व ही रक्कम स्वत:कडे ठेवल्याची कबुली त्याने दिली आहे.