शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

आरोपींना तत्काळ अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:05 IST

स्थानिक पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री काहींना ताब्यात घेतल्याने शुक्रवारचा नियोजित बंद व्यापाऱ्यांनी मागे घेतला आहे. बुधवारी तीन व्यापाऱ्यांवर चाकू व दगडाने हल्ला व प्रतिष्ठानांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक न केल्यास शुक्रवारपासून शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय सर्व व्यापारी संघटनांनी घेतला होता.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : काहींना ताब्यात घेतल्याने बंद मागे

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : स्थानिक पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री काहींना ताब्यात घेतल्याने शुक्रवारचा नियोजित बंद व्यापाऱ्यांनी मागे घेतला आहे. बुधवारी तीन व्यापाऱ्यांवर चाकू व दगडाने हल्ला व प्रतिष्ठानांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक न केल्यास शुक्रवारपासून शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय सर्व व्यापारी संघटनांनी घेतला होता. तसे निवेदन त्यांनी गुरुवारी पालकमंत्री व जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. वृत्त लिहिस्तोवर शहरातील अनेक व्यापारी पोलिस ठाण्यात बसलेले होते.मंगळवारी परतवाडा शहरातील पेन्शनपुरा भागात सल्लू ऊर्फ सलमानची धारदार शस्त्राने दीपक ऊर्फ झाशी कुंबलेले याने त्याच्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने हत्या केली होती त्यानंतर बुधवारी दुपारी १० वाजता ५० ते ६० च्या जमावाने येथील काही दुकानांवर दगडफेक करून चाकूने व्यापाऱ्यांना गंभीर जखमी केले. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. शहरातील मुख्य मार्गावरील स्नेहा बुक डेपोनजीक ठिय्या आंदोलन केले होते. हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन केली. हल्लेखोरांचा शोध आहे. संबंधित हत्या प्रकरणात व्यापाऱ्यांचा कुठलाच संबंध नसताना विशिष्ट समाजाच्या जमावाने तेथे दगडफेक केल्याने जुळ्या शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला. उजिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके स्वत: जनता दरबाराच्या निमित्ताने शहरात उपस्थित होते. त्यामुळे प्रत्येक वेळी ते घटनेचा आढावा घेत अधिकाऱ्यांना निर्देश देत होते. बुधवारी दिवसभर ठिय्या आंदोलनानंतर व्यापारी संघटना व व्यापाऱ्यांनी सायंकाळी पुन्हा पोलिस ठाण्यात धाव घेतली.गुरुवारचा आठवडी बाजार दहशतीखालीदोन दिवस बाजारपेठ बंद असताना गुरुवारीसुद्धा परिस्थिती पूर्णत: निवळली नसल्याने नेहमीप्रमाणे गर्दी दिसून आली नाही. अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावला होता. सर्व प्रतिष्ठाने उघडी असताना खरेदीसाठी नागरिक फिरकलेच नाहीत.तीन टीम गठितबुधवारी शहरात दहशत पसरविणाºया हल्लेखोरांचा शोध प्रतिष्ठानाबाहेर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी घेतला. त्यातून अनेकांची ओळख पटल्याची माहिती आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे तीन पथक गठीत केले आहत बुधवारी प्रतिष्ठानांवर दगडफेक व चाकू हल्ला केल्यानंतर हे हल्लेखोर शहरातून पसार झाल्याची माहिती आहे पोलिसांनी गुरुवारी रात्रीसुद्धा त्यांची झडती घेतली. मात्र, हल्लेखोर दिसले नाही. फिर्यादी लखन श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ६० ते ७० आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत.गुरुवारी व्यापाऱ्यांचे निवेदन प्राप्त झाले. त्यांच्यासोबत चर्चा केली. आरोपींना तत्काळ अटक करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यादृष्टीने व्यापारी व नागरिकांना सहकार्याचे आव्हान केले आहे.- प्रवीण पोटे,पालकमंत्री अमरावती

टॅग्स :Pravin Poteप्रवीण पोटे