शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘साक्षी मला माफ कर, माझी चूक झाली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:31 IST

आर्वीनजीक कार अपघातात दुर्देवी मृत्यू झालेल्या पत्नीची स्मशानभूमित अखेरची भेट घेताना 'साक्षी मला माफ कर' माझी खूप मोठी चूक झाली, असे भावनिक उद्गार जखमी अवस्थेतील पती पंकज लोंधे यांनी काढले.

ठळक मुद्देसमाजमन सुन्न : जखमी अवस्थेत पंकजने दिला पत्नीला शेवटचा निरोप, लोंधे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

संदीप मानकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : आर्वीनजीक कार अपघातात दुर्देवी मृत्यू झालेल्या पत्नीची स्मशानभूमित अखेरची भेट घेताना 'साक्षी मला माफ कर' माझी खूप मोठी चूक झाली, असे भावनिक उद्गार जखमी अवस्थेतील पती पंकज लोंधे यांनी काढले. यावेळी पत्नीच्या विरहात अश्रूला वाट मोकळी केली. हा हृदय हेलावणारा प्रसंग पाहताच उपस्थितांना अश्रू रोखता आले नाही. हजारोंच्या उपस्थितीत शनिवारी दर्यापूर येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार पार पडला.दर्यापूर येथील विश्वकर्मा ज्वलर्सचे संचालक पंकज लोंधे, त्यांची पत्नी साक्षी व मुलगी सिया यांचा वर्धेला लग्नकार्यात जात असताना हा अपघात झाला. या घटनेनंतर एकीकडे मुलाला उपचारासाठी अमरावतीला दाखल केले, तर दुसरीकडे सुनेचा अंत्यसंस्कार! अशी परिस्थिती त्यांचे वडील व नातेवार्इंकावर ओढवली. साक्षीचे आर्वी येथे श्वविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कारही वेळेत करणे गरजेचे होते. पण तेव्हापर्यंत साक्षी गेल्याची माहिती उपचार घेत असलेल्या पंकजला नव्हती. ते पंकजला कसे सांगावे व जर नाही सांगितले तर पंकज नातेवाईकांना भविष्यात माफ करेल का? असे धर्मसंकट लोंधे कुटुंबीयांसमोर उभे ठाकले. डॉक्टरांनीही पंकजला यावेळी उपचाराची गरज असल्याने रिक्स घेता येणार नाही, असे सांगितले. पण काही वेळानंतर मोठ्या हिमतीने साक्षी गेल्याची माहिती नातेवाईकांनी पंकजला दिली. मला साक्षीजवळ आताच घेऊन चला. तिला शेवटचे पाहयचे आहे, असे म्हणत हाताची सलाईन काढून पंकज सायंकाळी ७.३० वाजता स्मशानभूमित पोहचले. साक्षीचा मृतदेह दुरून पाहताच त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला. माझी साक्षी कुठे आहे? माझी सिया कशी आहे, असे उपस्थिताना विचारू लागले. मृतदेहावर डोके ठेवून रडू लागले. पंकज यांचे एका तपापूर्वी मातृत्व हरविले. त्यातून ते कसेबसे सावरले नाही तोच पाच वर्षांच्या पहिल्या मुलीचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांनंतर दुसºया मुलाचाही मृत्यू झाला. काही वर्षांनी सिया नावाची तिसरी मुलगी झाली. या अपघातात थोडक्यात बचावलेली चार वर्षीय सियाचे संगोपण आनंदात सुरू असताना व सुखीसंसाराचा गाडा हाकत असताना अचानक एका क्षणात पत्नीनेही साथ सोडल्याने पंकजसह लोंधे कुटुंबीयावर दु:खाचे सावट पसरले. अतिशय सोज्वळ व मनमिळावू स्वाभावाची असलेली साक्षी व तेवढ्याच मोठ्या मनाचा असलेले पंकज यांच्याबदल बाबाप्रेमींना व नागरिकांना विशेष आस्था आहे.