शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकुलतेवर मात करीत रोशन बनला उपनिरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:27 IST

घरची आर्थिक परिस्थिती बेताची. आईवडील शेतमजूर. बालपणी न जाणतेपणी झालेली शिक्षणाची परवड. या परिस्थितीसमोर गुडघे न टेकता त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. स्पर्धा परीक्षेसाठी कुठलीही शिकवणी न लावता सातव्या प्रयत्नात तो पोलीस उपनिरीक्षक बनला.

ठळक मुद्देपालवाडीतील तरुणाची ध्येयकथा : निरक्षर आई-वडिलांची समर्थ साथ

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : घरची आर्थिक परिस्थिती बेताची. आईवडील शेतमजूर. बालपणी न जाणतेपणी झालेली शिक्षणाची परवड. या परिस्थितीसमोर गुडघे न टेकता त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. स्पर्धा परीक्षेसाठी कुठलीही शिकवणी न लावता सातव्या प्रयत्नात तो पोलीस उपनिरीक्षक बनला. ही यशोगाथा आहे, नजीकच्या पालवाडी गावातील रोशन सुधाकर राऊत या ध्येयवेड्या तरुणाची. दोन वर्षांपूर्वी त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्याचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. अन रोशनच्या आनंदाला भरती आली. विशेष म्हणजे रोशनचे आई-वडील निरक्षर आहेत. मात्र त्या निरक्षतेवर मात करून त्यांनी रोशनला जगण्याचे ध्येय दिले.घरी अवघी दोन एकर कोरडवाहू शेत. कुटुंबाच्या उदरनिवार्हाची संपूर्ण जबाबदारी त्या शेतावर न् शेतमजुरीवर. परिस्थिती प्रतिकूल असली तरी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनात यश मिळवायचेच, असा निर्धार रोशनने केला होता. त्याने सतत दोन वर्षे तिवसा येथील श्री राजश्री शाहू महाराज वाचनालयात रोज १२ तास लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. २०१७ मध्ये रोशनने राज्यसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यानंतर त्याच्या घरी आनंदोत्सव साजरा झाला. अवघ्या ७०० लोकसंख्येच्या पालवाडी गावातील एक तरुण पीएसआय झाल्याने गावातील तरुणांमध्ये काही करून दाखविण्याची जिद्द निर्माण झाली आहे.असा होता दिनक्रमरोज सकाळी ११ वाजता गावातून तीन किमी पायी भांबोरा फाट्यावर यायचा. तेथून तिवसास्थित वाचनालयात आल्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत तेथे अभ्यास करायचा. पालवाडी गाव हे ७०० लोकवस्तीचे असून या गावात सन २०१७ पर्यंत एसटी पोहोचलेली नव्हती. तो दररोज ६ किमी पायी प्रवास करायचा. या खडतर प्रवासातून त्याने हे यश संपादन केल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळत आहे.हलाखीच्या परिस्थितीतून मी पोलीस उपनिरीक्षक झालो. माझ्या कार्यकर्तृत्वातून सामान्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्नरत राहील. गावातील अन्य तरुण अधिकारी व्हावेत, यासाठी प्रयत्न करेन.- रोशन राऊत,पीएसआय उत्तीर्ण विद्यार्थी