लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : वलगावातील चांदूरबाजार रोडवर अवैध दारूगुत्त्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लहान मुले व्यसनांच्या विळख्यात अडकले असून, आत्महत्येची पाळी आपल्याच्या तीव्र प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत. पोलिसांच्या ‘आशीर्वादा’नेच अवैध दारूगुत्त्यांना ऊत आल्याचा आरोप महिलांसह नागरिकांनी केला आहे.समतानगर, बाजारपुरा, सतीनगर, देवीपुरा व भीमनगर परिसरात सर्वाधिक अवैध दारूची विक्री सुरू असून, त्यावर कोणाचे अंकुश नाही. या अवैध दारूविक्रीमुळे, त्या परिसरातून ये-जा करणाऱ्या लहान मुलांसह महिलांवर वाईट परिमाण होऊ लागले आहे. त्याच परिसरात अंगणवाड्या, शाळा-महाविद्यालये असून, ये-जा करणाºया मुला-मुली त्रस्त झाले आहेत. मद्यपी रोडवरच लघुशंका करीत असल्यामुळे मुलींसाठी ही बाब लाजीरवाणी ठरत आहे. याबाबत शेकडो महिलांनी पोलीस निरीक्षकांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यावर दखल घेतल्या गेली नाही. महिलांनी पोलीस आयुक्तांचेही दार ठोठावले आहे. मात्र, आजपर्यंत ठोस कारवाई झाली नसल्याची ओरड नागरिक करीत आहे. या अवैध दारूच्या विळख्यात अडकलेल्या काही तरुणांचे मृत्यूदेखील झाले असून, अनेकांची संसारे उघड्यावर आले आहे. तरीसुद्धा प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहे.अवैध धंद्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी माया पिसाळकर, वच्छला खांडेकर, तारा रामटेके, वर्षा गजभिये, कांता शेंडे, शोभा सावरकर, सूरज खांडेकर, सतीश गेडाम, आशिष शेंडे आीदंनी केली आहे.पोलीस मित्राचाही आरोपवलगाव हद्दीत अवैध दारूगुत्ते पोलिसांच्या ‘आशीर्वादा’नेच चालतात. मात्र, पोलीस निरीक्षक काही म्हणत नाही. सीपींना तक्रार केली; मात्र काही झाली नाही. असा आरोप पोलीस मित्र सूरज खांडेकर यांनी केला आहे. पोलीस मित्र असल्यामुळे पोलीस प्रशासनातील बारकावे सूरजला खडान् खडा माहिती आहेत. त्यामुळे हे अवैध धंदे पोलिसांच्या संगनमताने सुरू असल्याचा सूरजचा आरोप आहे.परवानाधारक दारूविक्री थांबवता येत नाही. अवैध दारुविक्री सुरू असेल, तर तक्रार करावी; आम्ही कारवाई करू. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारक्षेत्रातील ते काम आहे.- दुर्गेश तिवारी, पोलीस निरीक्षक, वलगाव ठाणे.
वलगावातील अवैध दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:21 IST
वलगावातील चांदूरबाजार रोडवर अवैध दारूगुत्त्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लहान मुले व्यसनांच्या विळख्यात अडकले असून, आत्महत्येची पाळी आपल्याच्या तीव्र प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत.
वलगावातील अवैध दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त
ठळक मुद्देमहिलांवर आत्महत्येची पाळी : पोलिसांचे सहकार्य असल्याचा आरोप