शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

झाडांच्या बुंध्यांशी आग लावून अवैध वृक्षतोड

By admin | Updated: April 18, 2017 00:19 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील वलगाव-चांदूरबाजार राज्यमार्गावरील झाडांच्या बुंध्याशी आग लाऊन....

राज्यमार्ग ओसाड : वलगाव-चांदूरबाजार मार्गावर सर्रास प्रयोगअमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील वलगाव-चांदूरबाजार राज्यमार्गावरील झाडांच्या बुंध्याशी आग लाऊन अवैध वृक्षतोडीची शक्कल लाकूड तस्करांनी लढविली आहे. त्यामुळे हा राज्यमार्ग ओसाड होत चालला असून याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड ही ब्रिटीशांची देण आहे. त्यानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वृक्षांचे जाळे विणले आहेत. मात्र, जिल्ह्यात काही राज्यमार्गांवरील विशालकाय वृक्षांवर तस्करांची नजर असून दिवसा झाडांच्या बुंध्याशी आगी लाऊन रात्री अवैध वृक्षतोड केली जाते. आग लाऊन ती झाडे खिळखिळे करणे आणि अवैध वृक्षतोड करणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे. अवैध वृक्षतोडीसाठी विशिष्ट समुदायातील व्यक्ती सहभागी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही बाब वनविभागाला चांगल्या तऱ्हेने माहितीे असताना ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा प्रकार सातत्याने सुरु आहे. मात्र, वनविभाग आणि बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मर्जीनेच राज्य मार्गावरील विशालकाय झाडे नष्ट केली जात आहेत. दिवसाढवळ्या झाडांच्या बुंध्यांना आग लावण्याचा प्रकार घडत असताना याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग ‘मौन’ आहे. अमरावती ते परतवाडा राज्य मार्गावरही हाच प्रकार यापूर्वी लाकूड तस्करांनी चालविला होता. शहरालगतच्या आरागिरण्यांत लाकूड होते फस्तअमरावती : त्यामुळे या मार्गावरील बहुतांश झाडे नष्ट झाली आहेत. आता वलगाव ते चांदूरबाजार राज्यमार्गाला लाकूड तस्करांनी लक्ष्य केले आहे. अवैध वृक्षतोड केल्यानंतर ते लाकूड शहरालगतच्या सीमेवरील आरागिरण्यांमध्ये फस्त केले जात आहे. मात्र, सीमेवरील आरागिरण्यांमध्ये विनापरवानगी लाकूड कोठून आणले जाते, हे तपासण्याची तसदी वनविभाग घेत नाही,हे वास्तव आहे. रेवसा, वलगाव परिसरात आरागिरण्यांमध्ये आडजात लाकूड मोठ्या संख्येने असल्याची विश्वसनीय माहिती आहे. मात्र, सदर आरागिरणी संचालकांचे राजकीय लागेबांधे असल्याने याआरागिरण्यांची तपासणी करण्यासाठी वनाधिकारी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील राज्यमार्ग ब्रिटीशकालिन वृक्षांनी नटलेला आहे. मात्र, यावृक्षांच्या बुंध्याशी आगी लाऊन ते नष्ट करण्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे. याप्रकरणी दोषींना कठोर शासन देण्यासाठी पुढाकार घेऊ.- संतोष जाधव कार्यकारी अभियंता, बांधकाम विभागपरतवाडा मार्गावरील वृक्षतोड कुणाच्या आशीर्वादाने?एकीकडे अमरावती-परतवाडा राज्यमार्ग हा हिरव्यागार वृक्षांनी नटलेला होता. मात्र, मागील चार-पाच वर्षांपासून या मार्गावरील वृक्षांची अवैध तोड करण्यात आली आहे. झाडांच्या बुंध्याशी आग लाऊन ब्रिटिशकालीन झाडे नष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे ही शेकडो वर्षांपूर्वीची झाडे कुणाच्या आशीर्वादाने नष्ट करण्यात आलीत, हे शोधून काढणे बांधकाम विभागासाठी आव्हान ठरणारे आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवणारा हा प्रकार तातडीने थांबविण्याची गरज पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वृक्षांभोवती आग लावण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.