शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

राज्यात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST

वनविभागाचा मूल्यांकन अहवाल, मध्य चांदा, सिंरोचा, भामरागड, गोदिंया आघाडीवर अमरावती : दरवर्षी वृक्षलागवड मोहीम राबविली जाते. मात्र, गत ...

वनविभागाचा मूल्यांकन अहवाल, मध्य चांदा, सिंरोचा, भामरागड, गोदिंया आघाडीवर

अमरावती : दरवर्षी वृक्षलागवड मोहीम राबविली जाते. मात्र, गत तीन वर्षांच्या अवैध वृक्षतोडीचा त्रैमासिक मूल्यांकन अहवालानुसार गतवर्षी सन २०२० मध्ये राज्यात सर्वाधिक अवैध वृक्षतोड करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. मध्य चांदा, सिंरोचा, भामरागड, गोंदिया अवैध वृक्षतोडीत आघाडीवर आहे. कोरोना संसर्गामुळे गतवर्षी अवैध वृक्षतोडीच्या प्रकारात वाढ झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

वनविभागात अवैध वृक्षताेडीचा त्रैमासिक अहवाल वन्यजीव आणि प्रादेशिक वृत्त कार्यालयाकडून प्राप्त होत असतो. या अहवालाच्या आधारे एखाद्या वनवृत्तात मागील तिमाहीच्या तुलनेत तसेच त्याच तिमाहीत गत वर्षीच्या तुलनेत अवैध वृक्षतोड कमी झाली अथवा वाढली, याबाबतचे मूल्यांकन करण्यात येते. सन २०१८, २०१९ आणि २०२० या तीन वर्षात झालेल्या अवैध वृक्षतोडीच्या अहवालाचे वरिष्ठांनी अवलोकन केले असता, मागील दोन वर्षांच्या तुलनेत गतवर्षी २०२० मध्ये अवैध वृक्षतोड झालेली आहे. अहवालानुसार सन २०१८ मध्ये ७३९८०, सन २०१९ मध्ये ६५२९३ तर, २०२० मध्ये ८६९५८ वृक्षांची अवैधरित्या कटाई करण्यात आल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. तसेच औरंगाबाद, उस्मानाबाद, पुणे वनविभागात गतवर्षी अवैध वृक्षतोड निरंक आहे.

---------------------

वृक्षतोड रोखण्यासाठी उपाययोजनांचे निर्देश

राज्याच्या १५ वन्यजीव आणि प्रादेशिक वनवृत्ताच्या परिक्षेत्रात सन- २०२० या वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीच्या घटना घडल्या आहेत. अवैध वृक्षतोडीची कारणमीमांसा शोधणे आणि त्यावर उपाययोजनांसंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना ४ जून रोजी पाठविलेल्या मेलद्धारे करण्यात आले आहेत.

---------------------

अवैध वृक्षतोडीची वनवृत्तनिहाय आकडेवारी

वनवृत्त २०१८ २०१९ २०२० (वर्ष)

- चंद्रपूर ४३८९ ५८०७ ६१९५

- गडचिरोली १२२१८ १२६७७ १४९२७

- नागपूर ७९२७ ६३४२ ९६५२

- अमरावती ८६९२ ८१६९ ७४२१

- यवतमाळ ४८८१ ४७८८ ७५२२

- औरंगाबाद ८३७८ ३४४८ ३९८९

- नाशिक ७१५ २३५ ३३४

- धुळे ८०३६ ६७६९ १११६७

- ठाणे ९३८२ ८७५५ १३५११

- पुणे ४३६ २०२ २८९

- कोल्हापूर २३८१ १९०० ३२३१

- नागपूर व.जी. ३०१४ ३०९१ २७३९

- मुंबई वन्यजीव १९६० १३८२ ११५६

- मेळघाट व्याघ्र १५११ १७२८ ४८१८

- कादंळवन ०० ०० ०७्‌

-------------------------------

यंदाही निधीअभावी वृक्षलागडीवर प्रश्नचिन्ह

कोरोनामुळे यंदा वृक्षलागवडीवर मोठा परिणाम होणार आहे. आता ‘डेल्टा व्हेरिएंट’ हे नवे संकट उभे ठाकल्याने पुन्हा राज्य शासनाला आरोग्य यंत्रणा बळकट करावी लागणार आहे. त्यामुळे यंदाही वृक्षलागवड मोहिमेसाठी निधी उपलब्ध होणार नाही, असे संकेत दिसू लागले आहे. परिणामी वनविभाग, सामाजिक वनीकरण, व्याघ्र प्रकल्प अथवा वन्यजीव विभागाला रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवावा लागेल, यात दुमत नाही.