फोटो आहे
अमरावती : मोर्शी वनपरिक्षेत्रांतर्गत नया वाठोडा नदीपात्र परिसरातून वनजमिनींवरील अवैध उत्खनन करताना दोन ट्रॅक्टर जप्त केल्याची कारवाई सोमवारी दुपारी ३ वाजता वनविभागाने केली. याप्रकरणी दोन चालकांचे बयाण नोंदवून वनगुन्हा जारी करण्याची प्रक्रिया उशिरा सायंकाळपर्यंत सुरू होती. विभागीय वनाधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
मोर्शी वनपरिक्षेत्रात फिरते पथकाने वनजमिनींवर अवैध उत्खननप्रकरणी दोन ट्रॅक्टर आणि चालकांना ताब्यात घेण्यात आले. गत काही दिवसांपासून वनजमिनींवर गौण खनिज चोरीला जात असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार फिरत्या पथकाने सापळा रचला आणि अवैध गौण खनिज चोरट्यांना जाळ्यात घेतले. फिरत्या पथकाचे वनपरिक्षेंत्राधिकारी प्रशांत भुजाडे, मोर्शीचे वनपरिक्षेत्राधिकारी आनंद सुरत्ने, मोर्शीचे वनपाल के.डी. काळे, पंकज वानखेडे आदींनी कारवाई केली.