शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

मांस विक्री कायद्याकडे दुर्लक्ष

By admin | Updated: July 23, 2016 00:46 IST

प्राण्यांची कत्तल आणि मांस विक्रीबाबत अनेक कायदे असले तरी याची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही.

उघड्यावर मांस विक्री : नागरिकांच्या आरोग्यास धोका वरुड : प्राण्यांची कत्तल आणि मांस विक्रीबाबत अनेक कायदे असले तरी याची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही. याचा बालमनावर विपरीत परिणाम होतो. उघड्यावरची मांसविक्री व रोगट प्राण्यांच्या मांसामुळे खवय्यांना दुर्धर आजारांची लागण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. बदलत्या काळात ७० टक्के नागरिक मांसाहार करतात. यामुळे गावागावात मांस विक्रीचे दुकाने उघडयावर थाटले आहेत. तर खवय्याकरता मांस हे अन्न आहे. त्यामुळे मानवी आरोग्याच्या सुरक्षेबाबत अन्न व औषधी प्रशासन विभागाला याबाबीशी काहीही घेणे देणे नाही. वरुड तालुक्यातील अनेक गावात उघडयावर खुलेआम प्राण्यांची कत्तल केल्या जाते. या गावातील बाजार केवळ मांसासाठी प्रसिध्द असतो. अनेक प्राणी व पक्ष्यांचे मांस या बाजारात विक्रीस उपलब्ध असते. पंचक्रोशीतून केवळ मांस घेण्याकरिता या ठिकाणी खवय्यांची रीघ लागते. कत्तलीनंतर तीन बांबूवर टांगून त्याचे विच्छेदन केले जाते. शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, महिलांना हा किळसवाणा प्रकार पाहून त्यांच्या मनावर याचा विपरीत परिणाम होत आहे. शाकाहारी मणुष्यासांठीसुध्दा हा प्रकार किळसवाणा आहे. प्राण्यांचे विच्छेदन केल्यानंतर अनावश्यक अवयव अस्ताव्यस्त वाटेल तेथे फेकण्यात येते. फेकलेल्या अवयवावर कुत्रे, वराह यथेच्छ ताव मारून पुन्हा विच्छेदन करतात. तसेच उघड्यावर विक्रीस असलेल्या मांसावर घाणीतील माशा घोंघावतात. रोगट प्राण्यांच्या मासांमुळे मानवी आरोग्याला धोका असून प्रशासन मात्र सुस्त आहे. प्राणी व पक्ष्यांची कत्तल व मांस विक्रीबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेतली असता अनेक बाबी उघड झाल्या. कोणत्याही प्राण्यांची कत्तल करण्याबाबत कायदयाचे बंधन आहे. मांस विक्री करण्यासाठी नगरपरिषद, ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या दुकानातूनच मांस विक्री करणे बंधनकारक असताना शहरासह खेडयापाडयात या कायद्याची अंमलबजावणी होताना कुठेही दिसत नाही. कत्तल करण्यापुर्वी प्राण्यांची वैद्यकीय तपासणी करणे आणि नंतरच प्राण्याची कत्तल करणे गरजेचे असते. जर सदर प्राणी रोगट असला तर त्याचे मांस खाण्यायोग्य राहत नाही. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रानंतरच प्राण्याची कत्तल केल्या गेली पाहिजे, असे निर्देश आहे. परंतु हे सर्व नियम असताना कायद्याची एैशीतैशी करून कायद्याला केराची टोपली दाखविण्यात येत आहे. यामुळे उघड्यावर मांस विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सर्रास तालुक्यात सुरू आहे. (प्रतिनिधी)