ग्राहकांची लूट : राष्ट्रीय खादी भंडारचा ‘जावईशोध’ संदीप मानकर अमरावती सरोज चौकातील खादी भंडारने नवा जवाईशोध लावला आहे. एखाद्या ग्राहकाने येथे खरेदी केली असेल व त्यांना कॅशलेस व्यवहाराठी एटीएम कार्डने स्वॅप पेमेंट केले असेल तर प्रत्येक ग्राहकाला स्वॅप करण्याचे १० रुपये अतिरिक्त द्यावे लागत आहे. हे शासनाच्या धोरणाला तिलांजली आहे. नोटाबंदीच्या काळात असा नवा भ्रष्टाचार होत असेल तर याला आळा कोण घालणार, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. सविस्तर असे की, दर्यापूर येथील सचिन मानकर नामक ग्राहक सरोज टॉकीजजवळील राष्ट्रीय खादी भंडारमध्ये कपडे खरेदीसाठी गेले, त्यांनी १७८० रुपयांची खरेदी केली. ७८० रुपयांचे नगदी पैेसे दिले. व हजार रुपये स्वॅपने पे केले. मात्र कॅशलेस व्यवहारासाठी त्यांनी राष्ट्रीय खादी भंडारच्या मालकाला, एटीएम दिले. तुमचे जेवेढे पेमेंट झाले आहे त्या व्यतिरक्त कार्ड स्वॅप करण्याचे १० रुपये आगाऊ द्यावे लागतील, असे ते म्हणाले. ग्राहकाने १० रुपये देण्यास नकार दिला असता ते पैसे द्यावेच लागेल, आम्ही पैसे देऊन मशीन विकत घेतली आहे. यावरच तर आमचा घरखर्च चालतो, असेही ग्राहकाला बजावण्यात आले, असे म्हणाले, मात्र १० रुपयांसाठीचा वाद असल्याने त्याच्याशी अधिक न बोलता एटीएमने पेमेंट करून त्याला १० रुपये आगाऊ संबंधित ग्राहकाने दिले. त्यामुळे शासनाने नोटाबंदी केल्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी सक्तीचे प्रयत्न केल्या जात आहे. स्वॅप मशीनच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहाराचे धोरण आहे. पण अशा प्रकारचा हा प्रकार होत असेल तर याला जिल्हाधिकाऱ्यांनी आळा घालावा, अशी मागणी होत आहे. प्रकरणाची व्हावी चौकशी शासनाचे कॅशलेस व्यवहार करण्याचे धोरण आहे. देशात होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसावा, याकरिता शासनाने हजार व पाचशे रुपयांच्या नोटाबंदीचा क्रांतिकारी निर्णय घेतला. पण आता कॅशलेस व्यवहारासाठी अनेक व्यापारी व दुकानदार स्वॅप मशीनचा वापर करीत आहे. पण काही दुकानदार कार्ड स्वॅप करायाचे असेल तर १० रुपये अतिरिक्त मोजावे लागेल, असा फंडा वापरत आहे. ही तर ग्राहकांची शुध्द लूट आहे. त्यामुळे असा प्रकार करणाऱ्याविरुद्ध कारवार्इंचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय खादी भंडार हे शासनाच्या ग्रामोद्योगाला उत्तेजन देण्याच्या उद्देशाने याला चालना देण्याच्या हेतुने शासन अशा खादींच्या दुकानांना सबसिडी देते. परंतु असे दुकानदारच असा प्रकार करीत असतील तर अनेक व्यापाऱ्यांनी याचा काय आदर्श घ्यावा, हा प्रश्नही पुढे येत आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहाराला ही अडचण ठरू पाहत आहे. मी बुधवारी राष्ट्रीय खादी भंडारमधून १७८० रुपयांची खरेदी केली. ते बिल देताना स्वॅप मशीनचा वापर केला असता स्वॅप मशीनने पेमेंट कराल तर १० रुपये शिल्लक द्यावे लागतील. दुकानदाराशी वाद घातल्यानंतरही १० रुपये द्यावेच लागले. नाहीतर कपडे परत द्या, अशी अट त्यांनी घातली. - सचिन मानकर, सामाजिक कार्यकर्ता, दर्यापूर
कार्ड स्वॅप केल्यास पडतोय १० रुपयांचा भुर्दंड
By admin | Updated: December 23, 2016 00:16 IST