शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

कानठळ्या बसवणारा आवाज करीत दुचाकी चालवाल तर खबरदार, सायलेन्सरवर चालेल रोडरोलर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 07:00 IST

Amravati News बुलेट किंवा तत्सम वाहनांच्या सायलेंसरमध्ये बदल करून धडधड आवाज करीत जाणाऱ्या बुलेटवीरांवर वाहतूक शाखेने दंडाचा बडगा उगारला आहे.

ठळक मुद्देसायलेन्सरमध्ये बदल केल्यास कारवाईचा बडगा

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बुलेट किंवा तत्सम वाहनांच्या सायलेंसरमध्ये बदल करून धडधड आवाज करीत जाणाऱ्या बुलेटवीरांवर वाहतूक शाखेने दंडाचा बडगा उगारला आहे. ध्वनिप्रदूषणात भर घालणाऱ्या त्या मॉडिफाईड बुलेट सायलेन्सरवर आता रोडरोलरदेखील फिरविला जाणार आहे. (If you ride a bike with a ringing sound, be careful, the road roller will crush your silencer.)

रस्त्याने जोराचा आवाज करीत भरधाव जाणाऱ्या बुलेट सध्या नागरिकांची डोकेदुखी ठरत आहेत. दुरूनच या वाहनांचा आवाज यायला लागतो आणि ती जवळ आली की, रस्त्यावरील अन्य दुचाकीचालक विशेषत: वृद्ध आणि शालेय विद्यार्थी घाबरून, भांबावून जातात. त्यातूनच छोटे-मोठे अपघात होत असतात. शहरात कॅम्प, पंचवटी, शिवाजीनगर, व्हीएमव्ही रोड, कठोरा रोड या मार्गांवर अशा दुचाकीस्वारांचा धुमाकूळ असतो. अशांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील १५ दिवसांत २७ वाहनांचे मॉडीफाईड सायलेंसर काढून घेऊन त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मॉडिफाईड सायलेंसर काढून त्याऐवजी दुसरे आवाज न करणारे सायलेंसर लावून घेतल्यानंतरच ती वाहने सोडण्यात येत आहेत.सायलेंसर मॉडिफाय करायला येतो पाच हजारांचा खर्चदुचाकीतून विशिष्ट आवाज येण्यासाठी सायलेंसरमध्ये काही बदल घडवून आणण्यात येतात. त्यासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च केले जातात. दरम्यानच्या काळात पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे या चालकांना धाक बसल्याचे दिसत आहे. २०२१ च्या ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात २७ वाहनांचे मॉडिफाईड सायलेंसर काढण्यात आले. मोटार वाहन कायद्यातील १९० (२) या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली. या नियमानुसार १००० रुपये दंड होऊ शकतो. जबर दंड बसल्याशिवाय अशा दुचाकीचालकांना कायद्याचा धाक बसणार नाही.३३ लाखांची बाईक चालविणारा टार्गेटएका तरुणाने तब्बल ३३ लाख रुपयांची दुचाकी घेऊन शहरात धूम माजविली आहे. शहरातील तीनही उड्डाणपूल, पंचवटी ते इर्विन चौक, चपराशीपुरा ते रेल्वे स्टेशन चौकातून तो शहरभर प्रचंड आवाज करणारे मॉडिफाईड सायलेंसर बसवून फिरत असतो. त्याच्या बेदरकार वेगाबाबत शहर वाहतूक शाखेकडे तक्रारदेखील आली आहे. त्यामुळे तो बुलेटराजा पोलिसांच्या रडारवर आला आहे.शहरात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांसंदर्भात वाहतूक शाखेकडे तक्रारी आल्या. सबब, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या व मॉडिफाईड सायलेंसरवर कारवाई करण्यात येत आहे. ज्यांनी आपल्या बुलेटला मॉडिफाईड सायलेंसर लावून घेतले, त्यांनी ते स्वत:हून काढून टाकावेत.- बाबाराव अवचार, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

टॅग्स :pollutionप्रदूषण